बौद्ध महासभेच्यावतीने भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक कंधार येथे माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

प्रतिनिधी, कंधार

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, माता रमाबाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक, भीमगड, कंधार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उजाळा दिला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे, प.स.सदस्य उत्तम चव्हाण, नगरसेविका अनिता कदम, जेष्ठ नागरिक नाना गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष
आर. एन. गायकवाड, समता सैनिक दलाचे संतोष ढुंडे, मधुकर कांबळे, माधव कांबळे, अनिल कदम, बळीराम कांबळे, जितेंद्र ढवळे, पत्रकार राजेश्वर कांबळे ,  पञकार एन. डी. जाभाडे, मुरलीधर थोटे,  प्रसन्नजित ढवळे, विनोद कांबळे, माधव गायकवाड, मधुकर मुन्नेश्वर, विठ्ठल ढुंडे, संभाजी कांबळे, संजय जोंधळे, नंदा भालेराव, रेखा कदम, जानका मोडके, प्रतिभा कांबळे, दैवशाला कांबळे, छाया सुर्यवंशी आदींसह बौद्ध उपासक व उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सी. डी. कांबळे  यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *