अखील भारतीय मराठी पत्रकार संघाच्या कंधार तालुका उपाध्यक्षपदी धोंडीबा बोरगावे यांची बिनविरोध निवड.

अध्यक्ष म्हणून योगेंद्रसिंह ठाकूर तर सचिव म्हणून हाफिज घडीवाला

प्रतिनिधी..

     अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ कंधार तालुका उपाध्यक्षपदी फुलवळ येथील पत्रकार धोंडीबा बोरगावे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद नांदेड जिल्ह्याशी संलग्न असलेल्या कंधार तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारणी फेरणीवडीची महत्वपूर्ण बैठक  ता. ६ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड दिगंबर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य धोंडीबा बोरगावे यांच्या उपस्थितीत कंधार पंचायत समिती च्या बचत भवन सभागृहात संपन्न झाली.

 यावेळी ऍड सत्यनारायण मानसपुरे , योगेंद्रसिंह ठाकूर , हाफिज घडीवाला , गंगाप्रसाद यन्नावार , एन. डी. जाभाडे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

    या बैठकीला कंधार सह फुलवळ , उस्माननगर , शिराढोण , बारुळ , कुरुळा येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत सर्वानुमते कंधार तालुका पत्रकार संघाची एकंदरीत सर्वच कार्यकारणी बिनविरोध काढण्याचा ठराव संमत झाला. त्यानुसार कंधार तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून योगेंद्रसिंह ठाकूर तर सचिव म्हणून हाफिज घडीवाला , कोषाध्यक्षपदी महोम्मद अन्सारोद्दीन , कार्याध्यक्ष पदी एन डी जाभाडे , सहसचिव गंगाप्रसाद  यन्नावार , उपाध्यक्ष म्हणून फुलवळ सर्कल मधून धोंडीबा बोरगावे , उस्माननगर मधून अमजद पठाण , कुरुळा मधून विठ्ठल चिवडे , सहसचिव एस पी जाधव ,  सहकार्याध्यक्ष शुभम डांगे , रुकमाजी कोल्हे , प्रसिद्धी प्रमुखपदी विठ्ठल कतरे यांच्यासह सदस्य म्हणून विश्वांभर बसवंते , यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    या बैठकीला फुलवळ मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर डांगे , सचिव दिगंबर डांगे , मधुकर डांगे , विश्वांभर बसवंते यांच्यासह तालुक्यातील सर्व सर्कल मधून अनेक पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *