लोहा येथे श्री दाताच्या दवाखान्याचे उद्घाटन

लोहा येथे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी वाडे वाले कॉम्प्लेक्स शिवकल्याण नगर मध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आणि छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप अहमदपूर चे अध्यक्ष श्री एन डी राठोड यांच्या हस्ते श्री दाताचा दवाखाना आणि एम प्लांट सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता करण्यात आले. दवाखान्याच्या डॉक्टर स्वाती बाबुराव पवार यांनी सांगितले की दाताच्या संदर्भातील सर्व सेवा या दवाखान्यात दिल्या जातील. स्वाती बाबुराव पवार ह्या दंतचिकित्सक मधील एमडी आहेत. त्यांनी यापूर्वी घाटी रुग्णालय रुग्णालय औरंगाबाद येथे रुग्णाची सेवा केलेली आहे. त्या अनुभवी असून निष्णात आहेत. या दवा खा न्या मुळे लोहा शहरातील आणि परिसरातील रुग्णांची सोय झालेली आहे. या उद्घाटन प्रसंगी श्रीमती इंदुबाई बाबुराव पवार, श्री गुलाब नामाची पवार सचिन बाबुराव पवार, डॉक्टर वैभव नामदेव राठोड, डॉक्टर सपना वैभव राठोड, देविदास पवार आष्टुर, उल्हास पवार अमदपुर, प्राध्यापक नामदेव रामराव राठोड, सचिन बाबुराव पवार सोनू प्रकाश राठोड आष्टुर, उत्तम सोमनाथ चव्हाण मंजू नाईक तांडा, माधव मेहत्रे अश्टुर, गणेश जोड राणे आदेश राऊत कल्याण पवार आष्टुर, गोवर्धन चव्हाण डोंगरगाव, गजेंद्र तेलंगे मोघा, प्रदीप राठोड जिंतूर, पत्रकार प्राध्यापक भगवान आमलापुरे, शीघ्र कवी विजय पवार लिंबोटी, सहशिक्षक गुलाब चव्हाण मंचु नाईक तांडा आणि इतर अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ हजर होते.

याप्रसंगी उद्घाटक श्री एन डी राठोड, डॉक्टर स्वाती बाबुराव पवार आणि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विजय पवार आणि प्राध्यापक भगवान आमलापुरे यांनी केले तर आभार सचिन बाबुराव पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *