गऊळ ; शंकर तेलंग
गऊळ ता. कंधार गावच्या दांडावरील महादेवाच्या सप्ताह दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमदभागवत कथा ज्ञानवस सोहळा पाचवा दिवस संपन्न
भागवतकार मंचक महाराजांनी आपल्या वाणीतून भक्तांना श्रीराम प्रभू च्या चरित्राच्या विचाराचे आईवडिलांची सेवा बंधुभावाचे एकात्म प्रेम असणे आवश्यक आहे. असे भक्तांना उपदेश केला आहे. पुढे सांगत असताना कितीही श्रीमंत नौकरी असून ज्ञानिवंत असो आईवडिलांची सेवा नसेल तर ते व्यर्थ आहे.
भक्तांना उदाहरण देत असताना जसा राम प्रभू लक्ष्मण दोघा भावाचं प्रेम आहे. त्यामध्ये समाजात बंधुभावाचे प्रेम असावे त्यांनी भागवत कथेतून भाविकांना उपदेश केला आहे.
भागवत कथा ऐकण्यासाठी गऊळ परिसरातील सर्व महिला पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.