प्रहार जनशक्ती पक्षाची कंधार तालुका व शहर कार्यकारणी ची  विश्रामगृह कंधार येथे निवड – तालुकाध्यक्ष नवनाथ वाखरडकर यांची माहिती

कंधार ;

प्रहार जनशक्ती पक्षाची कंधार तालुका व शहर कार्यकारणी ची  विश्रामगृह कंधार येथे निवड करण्यात आली अशी माहिती तालुकाध्यक्ष नवनाथ वाखरडकर यांची दिली.

उप जिल्हाध्यक्षपदी वैजनाथ गिरी व कंधार शहर अध्यक्षपदी नवनाथ चिवळे, प्रहार विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्षपदी विश्वंभर पांचाळ कंधार युवा सरचिटणीसपदी संदीप पवळे, , प्रहार शेतकरी आघाडी बहादरपुरा सर्कल पदी अल्केश भोसीकर व कुरुळा सर्कल युवा अध्यक्षपदी लखन वाघमारे नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली

दिव्यांग कार्यकारणी ची निवड करण्यात आली अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला.

जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी दादा गेडेवाड यांनी सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व पुढील काळात अन्याय अत्याचार व निराधार,अपंग, कामगार, शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी कसुन व जोमाने काम केले जावे व प्रहार म्हणजेच काम असे सर्वांना आवाहन केले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी दादा गेडेवाड ,नांदेड शहर प्रमुख प्रीती पाल सिंग शाहू, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अजय हनुमंते, जिल्हा संघटक चांद भाई शेख, युवा लोहा तालुका अध्यक्ष गोविंद वडजे, मुखेड तालुका उपाध्यक्ष आदी ची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *