आशाताई शिंदे यांच्या हस्ते राजेश्‍वर कांबळे यांचा सत्कार

प्रतिनिधी, कंधार

उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार कंधार येथील पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांना नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांचा बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला.


यावेळी कंधार कृउबा समितीचे सभापती ज्ञानेश्वर चोंडे, शेकापचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख शेरुभाई, फुलवळचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे, शेकापचे तालुकाध्यक्ष अवधूत पेठकर, शहराध्यक्ष महेश पिनाटे, कंधारेवाडीचे उपसरपंच शंकर डिगोळे, नितीन पाटील, गिरीश मामडे, मारोती बोडके, गिरीश डिगोळे, मुरलीधर थोटे, वसंत मंगनाळे, शैलेश मामडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *