सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांना उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार प्रदान

कंधार- (प्रतिनिधी)
लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांना राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने “उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार” प्रदान करण्यात आला .

Iयावेळी नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगणूरे,जिल्हाध्यक्ष सुनील पाटील,श्याम पा सावळे, अंकुश पा ढाकणीकर , गिरीश डिगोळे सह पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शिंदे यांनी लोहा-कंधार मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील तळागाळातील महिलांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व सामाजिक क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेसाठी चे योगदान बघता स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने सौ आशाताई शिंदे यांना “उत्कृष्ट समाज सेविका पुरस्कार” नांदेड येथील भव्य कार्यक्रमात गौरव करून प्रदान करण्यात आला,सौ आशाताई शिंदे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *