फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
अखंड हिंदुस्थान चे दैवत , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुलवळ येथील संस्कार करिअर अकॅडमी च्या वतीने येथीलच इयत्ता ४ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन गटात शिवचरित्र व सामान्यज्ञान या विषयावर ५० गुणांची स्पर्धा परीक्षा ता. १७ फेब्रुवारी रोजी येथीलच श्री बसवेश्वर शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती त्यात लहान गटात ९४ विद्यार्थी तर मोठ्या गटात १०९ विद्यार्थी असे २०३ विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला होता.
प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक बी. एन . मंगनाळे , शुभम फसमल्ले , सचिन बसवंते विलास सोमासे ,आदित्य देवकांबळे, विनायक पोतदार, प्रकाश देवकांबळे , गोविंद माने यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले व शिवरायांना अभिवादन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
सदर स्पर्धा परीक्षा ही ५० गुणांची होती त्यात पन्नासच प्रश्न होते , या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ देण्यात आला होता. या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांला राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चे अध्यक्ष तथा सागर मल्टीसर्व्हिसेस चे मालक धोंडीबा बोरगावे यांच्या वतीने लहान गटासाठी प्रथम पारितोषिक म्हणून १५०१ रु रोख रक्कम देण्यात येणार आहे. द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याला सरपंच विमलबाई मंगनाळे यांच्या वतीने ११०१ रु रोख रक्कम देण्यात येणार आहे तर तृतीय क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांला मोहन पांचाळ सर यांच्याकडून ५०१ रु रोख रक्कम देण्यात येणार आहे. तर मोठ्या गटासाठी प्रथम पारितोषिक म्हणून कै.शिवहार दादा मंगनाळे युवा मंच च्या वतीने १५०१ रु रोख रक्कम देण्यात येणार आहे , द्वितीय बक्षीस गजानन भांडी सेंटर चे मालक दत्तात्रय डांगे च्या वतीने ११०१ रु रोख रक्कम देण्यात येणार आहे आणि तृतीय बक्षीस आराध्या कृषी सेवा केंद्र चे मालक परमेश्वर डांगे यांच्या वतीने ५०१ रु रोख रक्कम देण्यात येणार आहे असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी श्री बसवेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे आयोजकांनी सांगितले.
आयोजित स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभम फसमल्ले , सचिन बसवंते , विलास सोमासे ,आदित्य देवकांबळे, विनायक पोतदार, प्रकाश देवकांबळे, गोविंद माने व मित्रमंडळ व श्री बसवेश्वर विद्यालयातील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आखणी करून परिश्रम घेतले.
यावेळी उपसरपंच तुळशीदास रासवंते , बालाजी देवकांबळे , प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , नागनाथ गोधने , विश्वांभर बसवंते , उमर शेख , परमेश्वर डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.