दि.१६ फेब्रुवारी २०२२-महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् मुंबई व्दारा तसेच यवतमाळ भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय यवतमाळ यांचे मार्फत राज्यस्तरीय राज्यपुरस्कार चाचणी शिबीर रेड्डीज कॉन्व्हेंट स्कूल पाटणबोरी ता. पांढरकवडा येथे दि.१६ ते 18 फेब्रुवारी २०२२ या कालावधीसाठी आयोजित करण्यात आले आहे.
राज्य पुरस्कार चाचणी परिक्षा शिबीरामध्ये पात्र ठरणारे स्काऊट व गाईड यांना मा. राज्यपाल महोदय यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र असलेला पुरस्कार देण्यात येतो. यशस्वी स्काऊट व गाईड हे राष्ट्रीयस्तरावरील राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरतात. या शिबीरामध्ये स्काऊट- गाईड यांची स्काऊट- गाईड अभ्यासक्रम ,ज्ञान व कौशल्यावर आधारित लेखी ,तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते.
या शिबिरात रेड्डीज काँन्हेंन्ट पाटणबोरी, ता. पांढरकवडा येथील 18 स्काऊट व 15 गाईड तसेच श्री. चिंतामणी हायस्कुल कळंब येथील 05 गाईड असे एकुन 28 संख्या आहे. तसेच यांचे मार्गदर्शक श्रीमती मिनाक्षी ढोले व सविता रेड्डी या असून प्रस्तुत शिबीरात स्काऊट विभागाचे शिबीर प्रमुख श्री. प्रकाश हांडे (A.L.T) व शिबीर सहाय्यक म्हणून श्री.पराग खुजे (H. W.B) कार्य करत आहेत. तर गाईड विभागाचे शिबीर प्रमुख श्रीमती कविता पवार , व शिबीर सहाय्यक म्हणून श्रीमती. शालीनी शिरसाठ कार्य करत आहेत.
जिल्हा कार्यालयाच्या मार्फत जिल्हा संघटक श्री. गजानन गायकवाड, तालुका प्रमुख श्री. दिनेश घाटोळ (Pre. A.L.T) व श्रीमती. दिशा सिंगारकर उपस्थित होते.