कंधार
कंधार तालुक्यातील प्रहार कार्यकर्ता बैठक दि.१६ रोजी घेऊन कंधार तालुक्यातील सर्व समस्यावर चर्चा करण्यात आली.व कार्यकर्त्यांना आप आपल्या सर्कल मधील समस्या सोडवण्यासाठी सुचना दिल्या.
बहाद्दरपुरा येथील नेहरू भवनासमोरील रस्ता दुरुस्त व मन्याड नदीच्या पुलावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी मा. तहसीलदार साहेबांना व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.
8 दिवसात हा रस्ता दुरुस्ती चे काम सुरू केले नाही तर बहाद्दरपुरा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी नवनाथ वाखरडकर ता. प्रमुख कंधार, वैजनाथ गिरी युवा ता.प्रमुख कंधार, अंकुश तेलंगे युवा उप तालुकाप्रमुख कंधार, नवनाथ चिवळे शहराध्यक्ष कंधार,विश्वांबर पांचाळ विद्यार्थी आघाडी ता.प्रमुख कंधार, दस्तगीर शेख दिव्यांग ता. प्रमुख कंधार, संगिता वाखरडकर महिला दिव्यांग ता.प्रमुख कंधार, संगमेश्वर शिंदे शाखाप्रमुख दाताळा व कार्यकर्ते उपस्थित होते.