फूलवळ येथे शेतकऱ्याच्या पशूचे वंध्यत्व निवारण शिबीर संपन्न.मदर डेरी चा उपक्रम; पशुसंवर्धन विभाग व पशुवैद्यकीय विद्यापीठाचा पुढाकार.

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ येथे मदर डेअरी पशुसंवर्धन विभाग तसेच पशुवैद्यकीय विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ता. १७ फेब्रुवारी रोज गुरुवारी वंध्यत्व निवारण मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटक म्हणून एम. जी .पाटील सहाय्यक प्राध्यापक पशूप्रजनन विभाग परभणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.रत्नपारखी हे अध्यक्षस्थानी होते तसेच या कार्यक्रमासाठी डॉ. रवी सुरेवाड सहाय्यक आयुक्त डेअरी च्या वतीने महेश खिरप्पवार, वैभव वाणी, यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

      यावेळी वंध्यत्व या आजारावर मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.रत्नपारखी यांनी परिसरातील पशुपालकांनी महादुध प्रकल्पाचा पुरेपूर लाभ घ्यावा व शेतकऱ्यांनी मदर डेअरीस दूध पुरवठा करावा असे आवाहन केले.शिबिरात एकूण ५७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात ३८ जनावरावर वंध्यत्व तपासणी व उपचार करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात मदर डेरी अंतर्गत अनेक अभिनव उपक्रम राबविले जातात असल्याबद्दल दूध उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या शिबिरात डॉ. दिनेश रामपुरे डॉ. रवी सुरेवाड सहाय्यक आयुक्त , तालुका पशुचिकित्सालय कंधार डॉ. एस. एल. खुणे, डॉ.घोनसीकर डॉ.भालके , डॉ. बिरादार ,डॉ.दगडे, श्री धनगर, श्री वकटे, श्री गुट्टे ,श्री.बारुळे, श्री.मुंडे मदर डेअरी च्या वतीने महेश खिरप्पवार, वैभव वाणी, यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच डॉक्टर दिनेश रामपुरे यांनी प्रास्ताविक केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. एस.एल.खुणे यांनी केले . जनावरांची तपासणी व उपचार केले.

माजी सरपंच बालाजी देव कांबळे ग्रा.पं. उपसरपंच तुळसिदास रसवंते ग्रा.पं.सदस्य प्रविण मंगनाळे,श्रीकांत मंगनाळे कंधारे वाडी चे उपसरपंच शंकर डिगोळे, पत्रकार परमेश्वर डांगे,मधुकर डांगे , विश्वंभर बसवंते,उमर शेख,संजय डांगे, दयानंद स्वामी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *