कंधार येथे सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरात १५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कंधार,(वार्ताहर) दि.१८

राष्ट्रीय संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कंधार येथे आयोजित रक्तदान शिबिरात आज १५६ रक्तदात्यानी रक्तदान केले.

            राष्ट्रीय संत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंती निमित्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने कंधार शहरात मिरवणुकीस सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दि.१८ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या कै.वसंतराव नाईक सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन कंधार मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेंद्रसिंह ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रोज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पवार यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संघटनेचे अध्यक्ष मारोती पंढरे, छावाचे तालुकाध्यक्ष संभाजी लाडेकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड, काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख सतीश देवकते यांची उपस्थिती होती.

               सकाळी अकरा वाजता उदघाटना नंतर सुरू झालेल्या रक्त दान शिबीरात सायंकाळी पाच वाजे पर्यंत १५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संत सेवालाल माहाराज सार्वजनिक जयंती महोत्सवाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, कार्याध्यक्ष तथा भाजप तालुकाध्यक्ष भगवान राठोड, स्वागताध्यक्ष सुंदरसिंग जाधव, फुलसिंग राठोड, श्रीराम जाधव,  सुरेश राठोड, विषवनाथ पवार, सचिन जाधव, सुधाकर पवार, उद्धव राठोड, माधवराव जाधव, सचिन प्रल्हाद जाधव, सुनील राठोड, गजानन चव्हाण, विलास जाधव, रमेश राठोड, आनंद राठोड, प्रवीण राठोड आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *