गुरुकुल पब्लिक स्कूल घोडज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

कंधार प्रतिनिधी:-माधव गोटमवाड

कंधार तालुक्यातील घोडज येथे गुरुकुल पब्लिक स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे ही जयंती १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठया जल्लोषात शिवजयंती म्हणून साजरी केली जाते.

     गुरुकुल पब्लिक स्कूल घोडज येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि गुरुकुल पब्लिक स्कूल चे संचालक सुनील राठोड सर यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनप्रवासा विषयी आपले मनोगत व्यक्त केले.


                  यावेळी उपस्थित घोडज चे पोलीस पाटील भीमराव लाडेकर,घोडज चे रोजगार सेवक पंडित राठोड  ,उषा लाडेकर मॅडम,शिवनंदा मिरकुटे मॅडम ,लाडेकर मॅडम, माधव गोटमवाड सर व इतर शिक्षक ,विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *