वसंत मेटकर मराठी विषयात (NET)नेट परीक्षा उत्तीर्ण

कंधार ;

   उस्माननगर विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांनी राष्ट्रीय पाञता परीक्षा (नेट) मध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.

  युजीसी मान्यता प्राप्त राष्ट्रीय पाञता परीक्षा (नेट) २४ नोव्हेंबर २०२१मध्ये घेण्यात आलेली होती,सदरील परीक्षेत बीट-उस्माननगर गशिअ कार्यालय,कंधार येथील उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांनी मराठी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

यापुर्वी त्यांनी मराठी व शिक्षणशास्ञ विषयात ही (SET) सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत.

     उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी मेटकर हे विविध शैक्षणिक उपक्रम राबवणारे अधिकारी म्हणून परिचित आहेत,परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल कंधार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय येरमे,सर्व शि.वि.अ. सतिश व्यवहारे,राजेश्वर पांडे,सौ.अंजली कापसे, सर्व केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती,विषयतज्ञ,व कार्यालयातील कर्मचारी व तालुक्यातील शिक्षक मंडळी यांनी त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *