शॉकसर्किट मुळे २ एकर ऊसाला लागली आग!

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

फुलवळ पासून जवळच असलेल्या कंधारेवाडी येथील शेतकरी माधव निवृत्ती कंधारे यांच्या गावालगत असलेल्या शेताजवळ विद्युत डेपो असून आज ता. १९ फेब्रुवारी रोज शनिवारी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान अचानक झालेल्या शॉक सर्किट मुळे गट क्रं. २५ मधील माधव कंधारे यांच्या २ एकर ५ गुंठे शेतीत असलेल्या उभ्या ऊसाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कंधारेवाडी येथील नदी शेजारी असलेल्या विद्युत पुरवठा चा मुख्य डेपो हा माधव कंधारे यांच्या शेती लगत आहे. आज दुपारी अचानक या डेपोवर शॉक सर्किट झाले आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते करून टाकले. माधव कंधारे यांचा २ एकर ५ गुंठे जमिनीवर डौलदार ऊस होता. चार आठ सदर ऊसाची तोडणी करायची होती पण आज अचानक लागलेल्या आगीत पूर्ण ऊस जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशी माहिती येथील सरपंच शंकर डिगोळे यांनी दिली.

सदर ची आग विझविण्यासाठी गावातील अनेक तरुण , शेतकरी व गावकरी धावून आले पण आगीचा भडका एवढा भयानक होता की ती आग विझवणे अशक्य होते त्यामुळे उभ्या ऊसाचे होत्याचे नव्हते व्हायला वेळच लागला नाही. सदर घटनेची माहिती विद्युत वितरण विभागाला तसेच तहसील कार्यालय कंधार येथे दिली असल्याचे ही शंकर डिगोळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *