फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
अठरा पगड जाती-धर्माला एकत्रित घेऊन मावळे ही समान पदवी देत पर नारी ला मातेसमान दर्जा देण्याची शिकवण देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुलवळ येथे ठिकठिकाणी प्रतिमेचे , पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
फुलवळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले आणि सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी कंधार पं. स.चे माजी सभापती पंडितराव देवकांबळे , जि. प.शाळेचे मुख्याध्यापक बालाजी केंद्रे , माजी सरपंच बालाजी देवकांबळे , उपसरपंच तुळशीदास रासवंते , विठ्ठलराव तुप्पेकर , दिगंबर गलपवाड , विठ्ठलराव बोरगावे , आनंदा पवार , ग्रा.पं. सदस्य चंदबस मंगनाळे , प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , फुलवळ पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापूर्वी जि. प.कें. प्रा.शाळा , ग्राम पंचायत कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी केंद्रे , शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नागनाथ गोधणे , कामाजी मंगनाळे , नामदेव कपाळे , नागनाथ मंगनाळे , पत्रकार मधुकर डांगे , विश्वांभर बसवंते , मनोहर जाधव , हिरकांत मंगनाळे , बाळू गलपवाड , धोंडीबा बोरगावे , विकास पवार , रंगनाथ पांचाळ , सौरभ बोरगावे , सागर बोरगावे , विलास मंगनाळे , गजानन डांगे , सागर मंगनाळे , दत्ता डांगे , धम्मानंद जाधव , शादुल शेख सह गावातील अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी आनंदा पवार , दत्ता डांगे व महेश मंगनाळे यांच्या वतीने उपस्थित लोकांसाठी सुरुची अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली होती.