गऊळ
शंकर तेलंग.
गऊळ तालुका कंधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी केली जाते.
देश सेवा बजावणारे आर्मी माधव मारुती तेलंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. तसेच शिवाजी मंडळाचे अध्यक्ष शंकर बालाजी तेलंग यांनी पूजन केले.
जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी भाषण केले.
या कार्यक्रमाला यशस्वी करणारे तानाजी गिरे, भगवान गिरे, लक्ष्मण तेलंग , बंटी तेलंग भास्कर तेलंग मंगेश गिरे, शरद तेलंग प्रल्हाद तेलंग संदीप जायभाये प्रशांत ताटे लक्ष्मण हेंडगे तुकाराम श्रीमंगले यांनी शिवस्मारकाच्या जागेवर वृक्षारोपण केले.
तसेच या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कार्यालय सरपंच व सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, व्यापारी, आणि छत्रपती चे नवतरुण मावळे उपस्थित होते.