फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
लॉकडाऊन च्या काळापासून तारेवरची कसरत करत हाताला काम नसल्याने आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला संसाराचा गाडा हकवा तरी कसा हा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता , परंतु शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आर ए डी कार्यक्रम योजने अंतर्गत दुधाळ म्हशींचे वाटप करण्यात आले असल्याने संसाराचा गाडा हकण्यात आर ए डी चा नक्कीच हातभार लाभेल अशी पात्र लाभार्थ्यांतुन प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कंधार तालुक्यातील हरबळ ( प.क.) येथील गरजू शेतकरी कुटुंबाला मदत म्हणून दुधाळ म्हशींचे वाटप करण्यात आले.
उदगीर जि. लातूर येथील जनावरांच्या बाजारातून एकूण ३७ म्हशींची खरेदी करून उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर , कृषी पर्यवेक्षक जे.डी.पवार , आर.जी. सोनसळे , पशुधन विकास अधिकारी डॉ. श्याम खुणे , विमा प्रतिनिधी व्ही. बी. वाठोरे , कृषी सहाय्यक संभाजी वडजे यांच्या हस्ते दुधाळ म्हशींचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.
हरबळ येथील सरपंच प्रतिनिधी ज्ञानोबा टाले , उपसरपंच राहुल वाघमारे यांच्या उपस्थितीत बापूराव कागणे , गणपत टाले , श्रीराम कागणे , लक्ष्मण कागणे , बालाजी कागणे , गणेश टाले , सूर्यकांत कागणे , नामदेव भुरे , केशव कागणे , तानाजी वाघमारे , उद्धव गडंबे , दिगंबर वाघमारे या लाभार्थ्यांना दुधाळ म्हशींचे वाटप करण्यात आले.
शासनाच्या या योजने अंतर्गत होत असलेल्या महत्वपूर्ण मदतीमुळे आम्हा शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय साठी ची चालना मिळाली असून त्यातच डबघाईला आलेल्या संसाराला या योजनेचा कामधेनू सारखा आधार होऊन संसार गाडा हकण्यासाठी हा एक मदतीचा हात असल्याचे लाभार्थी शेतकऱ्यांतुन बोलले जात होते.