गऊळ ;शंकर तेलंग

अंबुलगा तालुका कंधार येथील ग्राम विकास एकता पॅनल सेवा सहकारी सोसायटी अंबुलगा 2022 या निवडणूक भरघोस मतांनी 12 पैकी 12 उमेदवारांनी भरघोस मताने विजय मिळवला. विजय मिळवलेला आहे.
निवडणुकीमध्ये अटीतटीचा सामना असून विजयाचं शिखर गाठणारे सार्थ ठरवत विजय मिळवला.
आदरणीय मनोहर बापुराव पाटील तेलंग यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली.
12 पैकी 12 उमेदवारांनी भरघोस मताने विजय मिळवला.
त्यामध्ये विजयी उमेदवार कराड संभाजी माधव, केंद्रे हनुमंत श्रीपती, गव्हाणे बालाजी दशरथ, बिजलगावे सूर्यभान गणपती, मुंडे देवराव मारुती, मुसळे दिगंबर सोपान, वडजे पंढरीनाथ बापूराव, शिरसे गोविंद सिताराम, देवकांबळे बाबू नारायण, गुद्दे राधाबाई बळीराम, टेंभुर्णी उषाताई तातेराव,

पवार पंडित सोमला, निवडून आलेल्या सर्व सभासदांनी व प्रमुख पॅनलचे मनोहर पाटील तेलंग यांनी गावकऱ्यांच तसेच अंबुलगा, ब्रह्म वाडी, पिंपळाची वाडी, टोकवाडी, शेल्लाळी, तांडा मतदार बंधू भगिनी जनतेचे आभार मानले .

