नांदेडःनांदेड येथील पूजा दत्तात्रय भालेराव यांना “इम्पॅक्ट ओन सोशल ॲडजस्टमेंट अँड स्टिग्मा इन फॅमिलीज हेविंग चिल्ड्रन विथ इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी” या विषया वरील लघु संशोधना करीता “डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे” ( बार्टी) तर्फे फेलोशिप पुरस्कार प्रदान करण्यात आली आहे.या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले आहे.
पूजा भालेराव यांंनी फेलोशिप करिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ७९.२% गुण प्राप्त करत यश मिळविले आहे. पूजाचे वडील सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय भालेराव यांचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले.त्यांच्या निधनाचा कुटुंबियावर मोठा आघात झाला.परंतु पूजा मानसिक आरोग्यावर प्रभावी काम करत असल्याने त्यांनी या संकटाचा धिरोदात्तपणे सामना केला.आणि यश प्राप्त करण्याची किमया साधली.त्यांनी मानसिक आरोग्य शाखेत अजून प्रभावीपणे काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या यशाचे श्रेय त्या आपल्या वडिलांना देतात. या यशाचे मनोविकृती समाजकार्य विभाग महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे विभाग प्रमुख श्रीकांत पवार, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे येथील अधिष्ठाता कु.अश्विनी ढेंबरे यांनी विशेष अभिनंदन केले.तसेच प्रा.डॉ. मारोती कसाब, प्रोफेसर डॉ. गंगाधर तोगरे,दीपक भालेराव , प्रा.डॉ. कांचन दीपक भालेराव, स्वप्निल भालेराव, राजेंद्रकुमार मुंदड़ा आदीनी कौतुक केले.