कंधार
जुनी पेन्शन योजना धारक असलेले आण्णा-पेशकार, अविनाश पानपट्टे , पेशकार ढगे यांनी आज कंधार तालुक्यातील संघटनेचे नेतृत्व करत आज दि.२२ फेब्रुवारी २०२२ रोजी मा. तहसिलदार कंधार यांना निवेदन देताना जुनी पेन्शन किती महत्त्वाची आहे व नवीन अंशदायी पेन्शनला का विरोध केला पाहिजे, खाजगीकरणाला विरोध नोंदवित संघटनेची भूमिका विशद केली… २३ व २४ रोजीच्या संपात कंधार तालुक्यातील कर्मचारी सहभागी होत असल्याचे व सक्रीय सहभागासह जाहीर पाठिंबा दिला
दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2022 रोजी असलेल्या राज्यव्यापी संपामध्ये होत उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार व तहसिल कार्यालय कंधार येथील सर्व अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, | तलाठी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी | असल्यामुळे नागरीकांना होत असलेल्या त्रासाबद्दल भिंती पत्रक लावून संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली आहे