कंधार
शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली शिक्षण परिषदेस कंधार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय येरमे साहेब,
शिक्षण विस्तार अधिकारी श्री.राजेश्वर पांडे साहेब, श्री.वसंत मेटकर साहेब,तेलंगवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, शा.व्य.समिती अध्यक्ष ,केंद्रप्रमुख श्री.काळे सर, श्री.ढोणे सर,श्री.कनशेट्टे सर व गटसाधन केंद्र कंधार चे साधनव्यक्ती,विषयतज्ञ उपस्थित होते.
शिक्षण परिषदेची सांगता शिक्षण विस्तार अधिकारी श्री.वसंत मेटकर साहेब यांनी सेट व नेट परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे व त्यांना ‘भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने “महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप नॅशनल अवार्ड-2021” मिळाल्याबद्दल त्यांचा संपूर्ण बिटच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.शा.तेलंगवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.कुलकर्णी मॅडम,सहशिक्षक श्री.साधू सर, श्री.शिंदे सर व सौ.नरंगले मॕडम यांनी परिश्रम घेतले.