अहमदपूर : राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या १०६ व्या जन्मोत्सवा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दि २६ फेब्रु २२ रोजी येथील भक्तीस्थळावर सकाळी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाजी यादवराव गंजगाळे, जामकर यांच्यातर्फे लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे पण आयोजन करण्यात आले होते.शि भ प किर्तनकेशरी भगवंतराव पाटील चांभरगेकर बाबांचे सुश्राव्य शिवकिर्तन झाले. बेल – भस्म आणि पुष्पाची उधळण झाली. त्यानंतर पार पडलेल्या धर्मसभेत १०८ सदगुरु निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वरकर यांचे आशिर्वचन पार पडले.राष्ट्रगीताने धर्मसभेची सांगता झाली.

छाया : प्रा भगवान आमलापुरे.