कंधार ;
शहरातील अतिशय वर्दळीचा असणारा बौद्धद्वार येथिल बौद्ध विहारा समोर मुख्य रस्ता आहे.मात्र गेल्या अनेक दिवसापासून रस्ता दुरुस्ती मंजुरी होवूनही नगरपालीका दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे गणेशोत्सवाचा दिवशी दि.२१ रोजी नगरसेविका लक्ष्मीबाई पवार यांचे चिरंजीव यांनी पुढाकार घेवून मुख्य रस्तावर सिलकोट टाकून दुरुस्ती केली आहे.मात्र पोळा गणेशोत्सव आदीसह सण उत्सव पाहता नगरपालीकेच्या वतीने रस्ता दुरुस्ती कृरणे अपेक्षित होते मात्र नगरपालीकेच्या वतीने याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
रस्ता दुरुस्ती केलेली मागणी मान्य झाली पण रस्ता मात्र गेले कित्येक दिवस दुरुस्त केला गेला नाही .ही समस्या तेथील व्यापारी व रहिवाशी यांनी नगरसेवक सौ.पवार यांचे चिरंजीव बाळासाहेब पवार यांना लक्षात करून दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब हा प्रलंबित प्रश्न स्वखर्चाने सोडवला .यासाठी कॉन्ट्रॅक्टर सुनील सादलापुरे यांनी सहकार्य केली.तसेच कामाच्या मदतीसाठी भाऊंचे मित्र मंडळ
पत्रकार मयूर कांबळे, लखन जोंधळे ,सचिन पट्टेकर ,कपिल जोंधळे,किरण कदम,मनोज कांबळे ,सचिन कांबळे, कविकुमार कांबळे, संदीप सोनकांबळे,किरण कांबळे, मनोज कांबळे, पबन कांबळे,संदेश कांबळे व व्यापारी राजू भाऊ गंजेवार, नितीन जोगे,मारोती डोईजड,संजय विस्वास
उपस्थिती होती.