आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोह्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात


 शहरातील जनतेत समाधान


 लोहा ; विनोद माहाबळे


नांदेड -लातूर राष्ट्रीय महामार्गावरील लोहा शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती.

नांदेड -लातूर राष्ट्रीय महामार्गावरील लोहा शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होतीवाहनधारकांना या रस्त्यावरून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती.

या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, आमदार शामसुंदर शिंदे

यांनी वरिष्ठ पातळीवर शहरातील मुख्य रस्त्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. 


 राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता सुनील पाटील यांची आमदार शामसुंदर शिंदे

यांनी भेट घेऊन लोहा शहरातील खराब रस्त्या संदर्भात त्रीव नाराजी व्यक्त करत

शहरातील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची व या रस्त्यावर तात्काळ हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम करण्याची मागणी रेटून धरताच अधीक्षक अभियंता सुनील पाटिल

यांनी हा खड्डेमय रस्ता तात्काळ दुरुस्त करून हॉटमिक्स चे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी अधीक्षक अभियंता यांनी सांगितले होते.

शहरातील रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात या अगोदरही वरिष्ठ पातळीवर मागणी रेटून धरल्यामुळे काल मंगळवारी लोहा शहरात सकाळी सहा वाजता

, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये  यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील खड्डेमय झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आल्याने

प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या शहरातील खराब रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग सुकर झाला आहे.

लोहा शहरातील जनतेत व वाहनधारकात या रस्त्याविषयी त्रीव संताप असताना व बऱ्याच दिवसापासून या रस्त्याचे काम होत नसल्याने शहरात नाराजी होती,

पण आमदार यांच्या वेळोवेळीच्या तळमळीच्या पाठपुराव्याने काल सकाळी लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रत्यक्ष ,

तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाल्याने लोहा शहरातील जनतेतून अभिनंदन होत आहे. यावेळी श्याम आण्णा पवार

ज्ञानोबा पाटील पवार, उपनगराध्यक्ष सोनू संगेवार ,काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक पंचशील कांबळे, नगरसेवक जीवन चव्हाण , ,सुधाकर सातपुते,सिद्धू   

पाटील वडजे, सचिन शिरसागर, अशोक सोनकांबळे ,नागेश हिलाल ,शुभम कदम ,प्रसाद जाधव, अमोल गोरे, सचिन कल्याणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *