कला शिक्षक दत्तात्रय एमेकर यांनी गणेशोत्सवात “शब्दांक्षर गणेश” रेखाटून केले गणेशाचे स्वागत

कंधार


सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचा अक्षर हा दागीना यांच्या सृजनशीलतेतून अनेक अक्षर गणेश रेखाटले आहेत

.पण या वर्षीच्या कोरोना संकटकाळात आलेल्या गणेशोत्सवात सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार या शब्दांचा वापर करुन श्री गणेशाची निर्मिती केली.

हा गणेश लेखनीवर आरुढ असुन मोदकांचे नैवद्य म्हणुन इंग्रजी अक्षरे व मराठी मुळाक्षरे समोर ठेवले आहेत.

सोबत पुराण काळातली पक्ष्यांच्या पंखाची लेखनी अन् सोबत शाईची दौत असुन अक्षरे लिहिण्यासाठी वही इंग्रजी अक्षर व मराठी अक्षरे गिरविण्यासाठी ठेवली आहेत.

घरगुती गणेशोत्सवात हा अक्षर गणेश पुजेला ठेवण्यासाठी तयार करुन दिड दिवसाच्या गणपती सोबत कंधारच्या शिवाजी नगरात एमेकर परिवाराच्या गोकुळ निवासस्थानी पुजनास आहे.

या गणेशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 सर्वांना गणेशोत्सवाच्या मोदक हर्षित सदिच्छा सुंदर अक्षर  कार्यशाळा कंधार च्या वतीने  दत्तात्रय एमेकर यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *