श्रध्दा हवी पण,अंधश्रध्दा नको

पाऊस येण्याची दाट शक्यता होती म्हणून स्कुटीचा वेग वाढवला.अचानक जोराचा पाऊस सुरु झाला म्हणून शिवपार्वती मंगल कार्यालयाजवळ गाडी थांबवली,

समोरच्या बंद शटर जवळ जाऊन थांबले,तिथे एक आजीबाई आगोदर येऊन थांबलेल्या होत्या.कळकट कपडे,सर्वबाजूनी फाटलेले स्वेटर,हातात एक पीशवी अन काखेत गाठोड,

मला पाहून पूटपूटल्या ताई लय जोराचा पाऊस हाय,जरा अलीकडे या. काय म्हणाव बाई दुनियेत लय पाप वाढलय .

मी त्यांच्याकडे पाहात म्हणाले आजी ऋतूचक्र बदललय,प्रदुषण खुप वाढलय ना….माझं बोलण मध्येच थांबत म्हणाल्या अन पाप…?ते तर प्रचंड प्रमाणात वाढल आहे पण त्याचा आणि निसर्गाचा काय सबंध?

देवा रे देवा…काय म्हणाव आता तुम्हाला?ताई…देवाला मानता का?हो मानते ना पण…माणसातल्या देवाला…आजी प्रश्नार्थक नजरेने पाहात म्हणाल्या”नास्तिक”हाय की काय ताई तुम्ही

?पाठीमाघे झाकून ठेवलेली टोपली त्यांनी समोर आणली,ती उघडली,त्यात बरेच देव ठेवलेले होते.पाऊस चालूच होता.ऐव्हाना या ठिकाणी दोन स्त्रीया आणि विशितला एक तरुण येऊन थांबला.

त्यातील एका स्त्रीने आजीबाईच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि म्हणाल्या माय हा माझा मूलगा शुभम ,याच्या माग लई सनी लागलीय एका वर्षापासून सारख बिमार पडतो लय दवाखाने केले,बाहेरच बी केलं…काय फरक नाही पडला.

आता सार देवाच्याच हवाली ,तुम्हाला “सकोन”बघता येतो का?व्हय बघता येतो की…आहो काकू तुम्ही काय नादी लागताय यांच्या,दवाखान्यात घेऊन जा ना मूलाला?ओ ताई तुम्हाला काही माहित नाही यातल,

देवाच बी असतया काही आजी म्हणाल्या,त्यांनी शुभला देवा समोर बसवले,मला मात्र आश्चर्य वाटले अरे भैया तू पण काय पडतोस या अंधश्रध्देच्या भानगडीत.चांगला शिकलेला दिसतोस की,

ताई मी यातल काही मानत नाही पण,आईसाठी सार करतो.तीला समजावून सांगण्याचा खुप प्रयत्न केला पण ती ऐकतच नाही

असू द्या यामूळे तीला समाधान मीळत.आम्ही बोलत असतांना आजीने “सकोन “पाहिला,जे काही सांगितल ते ऐकूण तर मला धक्काच बसला.

आता काय बोलाव अश्या वेड्या अंधश्रध्दाळू लोकांना?वरुन आजीने त्यांना एकशे एक रुपया दक्षिणा माघीतली.राखेची पुडी शूभमच्या हातावर ठेवत म्हणाली रोज ही भूकटी खात जा

,तुही सनी पळून जाईल.शुभवनेही मान डोलावत होकार भरला.अशी लोक अज्ञानी लोकांचा फायदा घेतात,तरुणांनी तरी या अश्या गोष्टीचा विरोध करायला हवा.

प्रथम आपल्या घरापासून सुरुवात करावी.तरच समाजात अंधश्रध्देला खतपाणी मीळणार नाही.आता पाऊस थांबला होता सर्वजण आपापल्या मार्गाने गेले,

मी पण निघणार तेवढ्यात ती आजीबाई म्हणाली,ताई टोपलीला हात लावा की,डोसक्यावर घ्यायची हाय,त्यांची टोपली उचलून डोक्यावर ठेवली,पाच दहा रुपये द्या की ताई मला,कशाला…लोकांना फसवून काढत आहात ना पैसै .

तेवढे बस्स झाले की तुम्हाला मी म्हणाले.ताई तूमच्यावर देव कोपल अश्यान ती बोलत होती मी तिच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करत गाडी चालू केली,घरी आले पण,

कश्यातच लक्ष लागत नव्हत.लोकांना देवाच्या नावावर फसवून स्वता:ची उपजिवीका चालवणा-या अश्या व्यक्ती स्वता;अज्ञानात खितपत पडलेल्या असतातच सोबत दुस-याला पण अज्ञानात खोलवर बूडवतात.


आज आपल्या समाजात अंधश्रध्देचे प्रमाण खुप वाढले आहे.एकीकडे भारत विज्ञात प्रगती करतोय आणि आपली जनता अंधश्रध्देच्या विळख्यात जात आहे

.तरुणाई दिवसे दिवस व्यसनात अखंड बूडत आहे.हे कूठे तरी थांबवायला हवं.मला वाटत श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नको.

समाजातील अज्ञानाचा फायदा घेउन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ साली कठोर कायदा केला.

पण समाजातील अंधश्रध्देचे प्रमाण कमी झालेलं नाही.खरच…”अंधश्रध्दा”ही मानवी जीवनाला मिळालेला शाप आहे,जो उत्कर्ष आणि उन्नतीच्या मध्ये युगानयुगे येत राहाणार.

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *