‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविणाऱ्या गावांचे अभिनंदन..!


घरोघरी श्रींचे आगमन. ते ज्यांच्या घरी आणि गल्लीत, नगरात होते तिथे आनंदाला पारावार राहत नाही. उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असतो.

यंदा उत्सवावर कोरोनाची काळी छाया पसरली आहे.

त्यामुळे प्रशासनाने एक गाव एक गणपती आणि एक प्रभाग एक गणपती असे आवाहन केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद येथे मुस्लीमांनी गणेशोत्सवासाठी मुहर्रमची मिरवणूक रद्द केली आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन! कोल्हापूरात तर ९७ गावात तर गणेशोत्सवच रद्द करण्यात आला आहे.

या गणेश मंडळाचा निर्णय केवळ अभिनंदासच पात्र नसून इतरांनी आदर्श घेतल्यासारखे आहे.

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्या गावांनी एकच गणपती बसवला आहे तेही अभिनंदनास पात्रच आहेत.‌

परंतु मोठ्या गावात, शहरात एकच गणपती बसवणे शक्य नसते. अशावेळी अनेक मंडळे,

बालमंडळेही गणेशाची स्थापना करतात. आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते कदाचित शक्य होणार नाही.

Atharv

गणेशोत्सवासाठी जे नियम घालून दिलेले आहेत. ज्या मार्गदर्शक सूचना किंवा प्रतिबंध

घालण्यात आले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपतींची स्थापना होणार नाही असे नाही.

कारण देव देवतांचे सण, उत्सव संबंधाने धार्मिक भावना आपल्या देशात आणि या संदर्भाने आपल्या महाराष्ट्रात तर आधीच अगदी तीव्र आहेत.

धर्म- राजकारण, धर्म- समाजकारण, अर्थकारण आणि सबंध मानवी जीवनच धार्मिक तत्वाने व्यापलेले आहे.

अशा परिस्थितीत अधार्मिक कृत्य खपवून घेतले जात नाही अशीच समाजाची संरचना आहे. गणेशोत्सव हा या धार्मिक संसकृतीचाच एक भाग आहे.

                   गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलावर मोठा ताण असतो.

त्यातच सार्वजनिक गणपतींची वाढती संख्या आणि आपलाच गणपती कसा मोठा आहे, हे दाखवून देण्यासाठी सुरू झालेली स्पर्धा,

त्यासाठी मिळेल त्या मार्गाने निधी जमविण्याचा मंडळांनी सुरू केलेला उद्योग आणि त्यातून होणारी वादावादी,

हाणामाऱ्या या सर्वामुळेच धार्मिक गणेशोत्सवाला गालबोट लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

त्यामुळे केवळ मुंबई, पुण्यासारख्या शहरातच नव्हे, तर गावा-गावातील गणेशोत्सव शांततेत पार पाडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरू लागले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवात होणारी पैशाची उधळपट्टी थांबावी, गावातील वाद मिटावेत आणि लोकवर्गणीचा

चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘एक गाव एक गणपती’चा पुरस्कार करीत हा उपक्रम गावागावात पोहोचविण्याचे काम केले.

राज्य सरकारनेही महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात एक गाव एक गणपती उपक्रमाचा समावेश करून या चळवळीला राजकीय आश्रय दिला.

source

राज्यातील खेडय़ांची संख्या विचारात घेतली तर ही संख्या फारच कमी आहे. ज्या ज्या गावात हा उपक्रम सुरू झाला आहे,

त्याचा सामाजिक आणि आर्थिक फायदा त्या गावाला मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

म्हणून

एक गाव एक गणपती हा उपक्रम केवळ योजनेपुरताच मर्यादित न ठेवता गृह विभागाने तो जलयुक्त शिवार या अभियानाप्रमाणे गावागावात पोहोचवायला हवा.

शहरी भागातही ‘एक प्रभाग एक गणपती’चा उपक्रम प्रभावीपणे राबविल्यास त्याचा सर्वार्थाने नक्कीच चांगला फायदा होईल.

मात्र त्यासाठी

राजकीय मानसिकता बदलण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागेल. यात त्यांना यश आले तर ‘एक गाव एक गणपती’ आणि ‘एक प्रभाग एक गणपती’च्या माध्यमातून गणेशोत्सवाचे उत्सवपण नक्कीच टिकून राहील आणि कायदेशीर हस्तक्षेपाचे संकटही दूरच राहील.


        १९६१ साली अचानक डोकं वर काढलेल्या प्लेगच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचाराबरोबर लोकांमध्ये जनजागृती होणं गरजेचं होतं.

यासाठी नव्या मुंबईतल्या आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी गावकऱ्यांसमोर ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना मांडली.

सुरुवातीला ग्रामस्थांमध्ये या संकल्पनेबद्दल शंका होती. घरामध्ये गणपतीची स्थापना न केल्यास देव कोपेल अशी भिती ग्रामस्थांना होती.

यावरही उपाय म्हणून कॉम्रेड पाटील यांनी स्वत:च्या घरातील मूर्तीपूजन बंद करून गावातील मंदिरात पूजन करत पुढाकार घेतला.अखेर कॉम्रेड पाटील यांची भूमिका ग्रामस्थांना पटली.

तेव्हापासून आजतागायत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवली जाते. महाराष्ट्रात घरगुती, सार्वजनिक गणपतींबरोबरच ‘एक गाव एक गणपती’च्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसते.

ही एक चांगली बाब आहे.  राज्यात दरवर्षी साधारणत: घरगुती, सार्वजनिक अशा ३० ते ३५ लाख गणपतींची प्रतिष्ठापना होते.

मात्र ग्रामीण भागातील सर्वार्थाने उपयुक्त असा ‘एक गाव एक गणपती’चा उपक्रम लक्षवेधी ठरतो.

उत्सव आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांना किंवा शहरी भागात विभागातील लोकांना दहा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जायचे

मात्र बदलत्या काळात त्याचा ‘इव्हेंट’ झाल्यापासून आणि त्यात राजकीय हस्तक्षेप वाढल्यापासून या उत्सवाची दशा आणि दिशा पुरती बदलत आहे.

त्यातूनच काही ल्यापासूनत दक्ष नागरिक आणि समाजसुधारक न्यायालयांच्या माध्यमातून या उत्सवाच्या मुळावरच घाव घालण्यासाठी सरसावू लागले आहेत, असा गणेशभक्तांचा आरोप आहे.

राजकारणी मंडळी सार्वजनिक मंडळाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी मोठ्या खुबीने उपयोग करून घेतात. त्यांच्याच वाढत्या हस्तक्षेपामुळे उत्सवाचा इव्हेंट झालेल्या दहीहंडीचा कसा राजकीय खेळ होतो तो आपण दरवर्षी सर्वचजण अनुभवतो.

गणेशोत्सवही राजकीय जोखडाबाहेर नाही.

त्यामुळे गावागावात आणि प्रभागात दिवसेंदिवस सार्वजनिक मंडळाच्या फलकांची संख्या जशी झपाट्याने वाढते तशीच सार्वजनिक गणपतींची संख्याही वाढत असते.

राज्यातील घरगुती, सार्वजनिक गणपतींचा आढावा घेतल्यास ही बाब लक्षात येईल.


गावांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे.

परंतु, गेल्या काही वर्षांपासून संकल्पनेला प्रतिसाद कमी लाभात असून, एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविणाऱ्या गावांची संख्या घटत आहे. 

पोलिस प्रशासनाकडून गावस्तरावर जनजागृती कमी होत असल्याने ही संख्या घटत चालली आहे. गावांमध्ये एकी रहावी, सर्वांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा, यासाठीही ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना पुढे आली.

ही संकल्पना पोलिस प्रशासनाकडून राबविण्यात येते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक होत असते.

करोना महामारीमुळे मोठी समस्या निर्माण झाली असून नागरिकांनी मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टन्स ठेवावे.

गणेशोत्सव व मोहरम या सणादरम्यान गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबवावी,

असे आवाहन सर्वच जिल्हा पोलीस प्रमुख शहरात शांतता कमिटीच्या बैठकीत केले.

डॉल्बीमुक्तीनंतर कोरोनाला हरवण्यासाठी यावर्षी एकच गणपती बसविण्यासाठी मंडळांच्या हालचाली सुरू होत्या.

खिलाडूवृत्तीने विधायक वाटचाल करणारी मंडळे या उपक्रमालाही नक्कीच प्रतिसाद देतील, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

D .G Waghmare

विनापरवाना श्रीगणेश मूर्ती प्रतिष्ठापना करणार्‍या व गणेशोत्सव संदर्भातील मार्गदर्शक सूचना शासन नियम मोडणार्‍या गणेश मंडळांची पोलिसांकडून गय केली जाणार नाही,

अशा मंडळांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यातून निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ९७ गावांनी सार्वजनिक गणेशोत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशमूर्ती बसवून उत्सवाच्या माध्यमातून जादा संसर्गाला हातभार न लावण्याचा गावांनी घेतलेला हा निर्णय आदर्शवत ठरणार आहे.

याशिवाय, जिल्ह्यातील ३०३ गावात ‘एक गाव एक गणपती’उपक्रम राबवण्यात येणार असून ही संख्या पाचशेपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. या सर्व गावांचे अभिनंदनच!

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करण्याचा आदेश दिला आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून करोना महामारीच्या संसर्गावर मात करण्यासाठी नागरिकांनी चांगले सहकार्य केले.

याअगोदरचे सण उत्सव, जयंत्या-मयंत्या नागरिकांनी साधेपणाने साजरे केले. तसेच यापुढील सण उत्सवही नागरिक साधेपणाने गर्दी टाळून साजरे करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

गर्दी टाळण्यासाठी मोठ्या गणेश मंडळांनी  आॅनलाईन दर्शनाची सोय केली पाहिजे. विसर्जनाचेही इकोफ्रेंडली संकल्प करायला हवेत. संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.

दहा दिवस भक्ती भावानं बाप्पाची सेवा केली जाते. त्यानंतर जड अंतकरणानं बाप्पाला निरोप दिला जातो. विसर्जनानंतर मात्र दुसऱ्या दिवशी बाप्पाच्या मूर्तीची झालेली अवहेलना पाहवत नाही.

इको फ्रेंडली नसल्यामुळं बाप्पाच्या अनेक मूर्तींचं विघटन होत नाही आणि मूर्तींचे अवशेष समुद्रकिनारी पाहायला मिळतात.

यासोबतच मोठ्या संख्येनं पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विसर्जन केल्यानं पाणी प्रदूषित होतं.  गणपती उत्सव इको फ्रेंडली पद्धतीनं  साजरा केला पाहिजे.

एक गाव एक गणपती योजना राबवून आपल्या घरीच टपामध्ये आपला गणपती विसर्जन करून ते पाणी आपल्या घरच्या कुंड्यामध्ये टाकून पाण्याचेही विसर्जन करता येईल. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करावा.

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पारंपरिक वाद्येच वाजवली पाहिजेत. डेकोरेशन साहित्यही पर्यावरणपूरक‌ असावे.‌ अनेक मंडळांनी मिळून एक गणपती  स्थापन‌ करावा.

‌ सर्वच गणेश मंडळांनी  प्लास्टिकचा वापर‌ कटाक्षाने टाळावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मूर्ती व निर्माल्य दान करुन मंडळाचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. 

      जिथे एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाते तद्वतच एक प्रभाग एक गणपती ही संकल्पनाही राबवायला हवी. एकच गणपती बसविण्याचा निर्णय तेथील सर्व गणेश मंडळांनी एकत्र येत घेतलेला असतो.

धार्मिक श्रद्धेपोटी ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्या एकतेत बांधल्या गेल्या पाहिजेत. थोड्याशा अहं, स्वार्थापायी आपण ही एकता अबाधित ठेवीत नाही. याला अनेक कारणे असू शकतात.

वाद आणि ईर्षा यातच आपण गुंडाळले गेलो तर एकतेची शकले होतात. एकत्र येणे आणि एकात्मता साधणे या दोन्ही गोष्टी भिन्न नाहीत.

मोठा समुह एकत्र आल्यानंतर वाद विवाद होणारच, गर्दी होणारच पण समज गैरसमजातून जे वाद निर्माण होतात, एकता भंग पावते ते टाळता येऊ शकते.

आपण सर्वांनी एकतेचे सौंदर्य अबाधित ठेवले पाहिजे.‌ गणेशोत्सव काळात कुठेही कसल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

सामाजिक प्रबोधनाचे कार्य आणि कोरोनाशी लढण्याचे बळ लोकांत निर्माण होईल याबाबतची आखणी पुढील काही दिवसांत झाली पाहिजे.

कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालता अत्यंत डोळसपणे दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करणे यातच खरे समाजभान आहे.

Gangadhar DHAVALE
-Gangadhar DHAVALE

गंगाधर ढवळे,नांदेड 

One thought on “‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविणाऱ्या गावांचे अभिनंदन..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *