देव माझा दोस्त झाला, मस्तपैकी !

देव माझा दोस्त झाला, मस्तपैकी !

या करू गोपाल काला, मस्तपैकी

देव माझा दोस्त झाला, मस्तपैकी !

souece

या नदीला हा अवेळी पूर कैसा

या नदीला हा अवेळी पूर कैसा

ही नदी बर्फात होती झोपलेली


सूर्य बर्फातून आला, मस्तपैकी !

पेरुया का माणसाचे शेत आधी


हा नवा दाणा मिळाला, मस्तपैकी !

रे.. तुझा शेंदूर काढू, मी म्हणालो
अन् विठू लाडात आला, मस्तपैकी !

शेंदुराचा ठोक धंदा थांबवू रे..


हे विठू मजला म्हणाला, मस्तपैकी !

रुक्मिणीला मी म्हणालो, जाग बाई..


बघ, विठू तैय्यार झाला, मस्तपैकी !

..शेवटी ठरले असे की भिंत पाडू


मग विठूही आत आला, मस्तपैकी !

-ज्ञानेश वाकुडकरअध्यक्षलोकजागर अभियान-


संपर्क – 9822278988 /  9325589603 /  8055502228

/ 9004397917 / 954502518

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *