तळमळीचा सामजिक कार्यकर्ता ‘दयानंद कांबळे’ यांना भारत सरकार निती आयोगाच्या आधार फाऊंडेशनचा ‘कोविड योध्दा पुरस्कार’ प्रदान !


 अण्णाभाऊ साठे जन्मशताब्धी वर्ष : पुष्प १८ वे
■ अभिनंदन !

लातुर जिल्हा आणि महाराष्ट्राला आपल्या दनक्या कार्यशैलीने सुपरीचीत असलेल्या दयानंद कांबळे या सद्गुणी शिक्षक बांधवाला भारत सरकारच्या नीती आयोगाच्या आधार फाऊंडेशनचा ‘कोवीड यौद्धा पुरस्कार जाहीर झाला हा मोठाच बहुमान आहे यासाठी आरंभी मन:पुर्वक अभिनंदन !


■ लाडझरीचं वैभव वाढवलं —


दयानंद कांबळे मुळचे लाडझरी ता परळीचे. अंबाजोगाई-अहमदपूर मुख्य रस्त्यावरचं हे मुठभर माणसांचं टुमदार गाव. मुख्य रस्त्यावर जिल्हा परीषदेची जुनी शाळा आणि हिरव्यागार झाडांनी वेढललं जुनंच महादेवाचं मंदीर.

इथली बैंगण-भाकर खाल्लेला माणूस मांसाहार नको म्हणेल असा खमंग आहार. देवदेव करणारी सात्विक मंडळी.अशी आनंदी पाश्वभूमी असलेल्या निसर्गरम्य गावी दयानंदजींचं प्राथमीक शिक्षण झालं.

वडील दामोदर किशनराव कांबळे सर प्राथमिक शिक्षक म्हणुन मांडवा, सारडगाव आणि हाळम येथे कार्यरत होते, आता रिटायर झालेत.

लाडझरीत झालेल्या तिन-चार काव्यमैफिलींनी गुरुजींची प्रसन्न उपस्थिती आणि गावक-यांचा त्यांच्याप्रती असलेला आदर अनुभवला आहे मी.

दोन वर्षा पुर्वी गावच्या कर्तुत्ववान मंडळींचा कार्यक्रमा दरम्यान दामोदर गुरुजी आणि कांही बुजुर्गांचा मनस्वी सन्मान माझ्या आणि महाराष्ट्र पत्रकार संघाचे सध्याचे अध्यक्ष मा वसंतभाऊ मुंडे यांच्या उपस्थितीत आस्मादिकाच्या हस्ते घडवुन आणला होता.

या गावचेच प्रा.डॉ.बाबुराव गायकवाड जे धारवाड विद्यापिठात मराठीचे प्राध्यापक होत ते ही दयानंदजींच्या गणगोतातलेच.डॉ गायकवाड सर साहित्यिक आहेत आणि त्यांचं कादंबरी लेखणही प्रकाशीत आहे.

तर या अशा शिक्षणाचा असा मुरलेला वसा दयानंदजींच्या पाठीशी आहे.दयानंदजींच्या वडीलांना मी आत्मकथन लिहिण्याची विनंती केली होती त्यांच्या सत्कारादरम्यान.

पारंपारीक कामं आणि शैक्षणिक कामं  इमानदारीनं करणा-या कुटुंबातला हा सद्गुणी मनुष्य लातुरला विवेकानंद चकातल्या यशवंत विद्यालयात इंग्रजी विषयाचा माध्यमिक शिक्षक झाला आणि हळुहळू कुटुंबाच्या कारकिर्दित कायापालट झाला.

गावाकडं आईबाप आणि भावंडांसाठी छान घर आहे. दयानंदजींचा पुतन्या अशीष त्याच्या वडीलांनी आणि दयानंद महोदयांच्या सल्ल्यानं माझ्याकडं अंबाजोगाईला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इंग्रजी शिकण्यासाठी पाठवला

आणि तो आज सोलापुरकडं अक्कलकोटला  कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचा विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहे.

डॉ दयाराम मस्के हे दयानंदजींचे मेव्हणे आहेत आणि शाळा शिकत असल्या पासुनचा आमचा परळीचा जिव्हाळा आहे.

दयाराम लातूरला शाहू महाविद्यालयात कॉन्ट्र्याकटवर प्राध्यापक असताना त्याची संपुर्ण तत्कालीन जबाबदारी दयानंदजींनी सांभाळली होती आणि महाविद्यालयात वंदनीय गादेकर सरांचा वैचारिक सहवास होता.

हे असं स्वत:च्या आणि गणगोताच्या शैक्षणिक कार्यात आपुलकीनं सहभागी होणारे दयानंदजी मला याही अर्थानं सज्जन मनुष्य वाटंत आले आहेत.

लाडझरीचे पत्रकार जे महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत मा वसंतराव मुंडे, उत्तम कवी रमेश मोटे आणि प्रा अशीष कांबळे, शिक्षक रामकिशन चाटे तलाठी …

असा शैक्षणिक आणि साहित्यिक अंगानं जोडलेलं गणगोत आहे. या मंडळीनं लाडझरीचं नाव शिक्षण,साहित्य आणि पत्रकारीतेत महाराष्ट्र आणि आता देशभर गैरवलेलं आहे.

ही सगळी मंडळी मला इंग्रजी आणि कवितेमुळं जोडली गेली असल्यानं जिव्हाळ्याची वाटते. दयानंदजींच्या कर्तुत्वाने त्यांच्या कुटुंबियांचाच नाही तर आपल्या गावाचाही मोठा मान सन्मान वाढवला आहे.

■ सद्गुणी शिक्षक———-

दयानंद गुरुजी लातूरच्या शाळेत माध्यमिक शिक्षक आहेत,इंग्रजी शिकवतात,संगीतात आणि भाषणात त्यांचा जीव रमतो.

शाळेच्या सामुहीक प्रार्थनेच्या वेळी मी त्यांना सुमधूर स्वरात प्रार्थणा आणि प्रेरणागीत सादर करताना अनुभवलं आहे.

शाळेच्या आतल्या चौकोनात “खरा तो एकची धर्म”, “या भरतात बंधूभाव नित्य वसू दे”अशी काळजाला स्पर्षून जाणारी गाणी गाणारा गोड गळ्यासह पेटी वाजवून म्हणणा-या दयानंद गुरुजीचं हे गोड रूप किती जनांनी पाहिलं आहे .

मला माहीत नाही परंतू मी हे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माजी खासदार  गोपाळ पाटलांसोबत एका मंचावर शेजारी बसून पाहिलं आहे.

मी त्यांच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा प्रमुख पाहुणा म्हणुन गेलो होतो आणि दयानंद महोदय आणि त्यांच्या सहकारी बांधवांनी केलेलं आदरातिथ्य  दयानंदजीं बद्दलच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या एकुनच उच्चकोटीच्या परंपरेचा भाग असेल.

.विद्यार्थी,सहशिक्षक प्रशासन आणि संस्थाचालकांचं निस्सिम प्रेम कमावलेला हा बहुगुणी शिक्षक खरा तर तेव्हाच मनातुन आवडला होता.



■ उत्तम समाज संघटक————————–


मला लातुरच्या समाज बांधवामध्ये कायमच आपापल्या शाळा महाविद्यालयांनी आणि चळवळीत काम करणा-या शिक्षक प्राध्यापक बांधवांचा आदर वाटंत आला आहे.

शिक्षकांमध्ये उत्तम दोरवे, बालाजी साळुंके , कविवर्य कांबळे, तोगरे महोदय  आणि दयानंद कांबळे ज्या एकोप्यानं वैचारिक देवान-घेवान करतात ती पाहून मनस्वी आनंद होतो.

लसाकम या समाजहीत जोपासना-या आणि समाजाला शैक्षणिक दिशा देणा-या चळवळीत ही मंडळी गादेकर सरांसोबत हमखास दिसून आली.

कुठल्याही छोट्यामोठ्या कार्यक्रमासाठी आरंभी सातमजली समोरचं वाचनालयाचं वरच्या मजल्यावरचं सभागृह आणि आता भालचंद्र ब्लड ब्यांकेचं सभागृह या ठिकाणी आपल्या संघटीत ताकतीची चुनुक दाखवत आले आहेत.

समाजातील गुणव़त विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान करणे हा या मंडळींचा नियमीत कार्यक्रम राहिला आहे आणि जयंती पुण्यतिथी तर आपल्या नैतिक नियमीततेचा भाग आहेचय.

या सगळ्या गोतावळ्याला हाक मारुन गोळा करायची जबाबदारी या तरुण मंडळीनं मोठ्या ताकतीनं पार पाडली आहे यात शिंहाचा वाटा दयानंद महोदया़चा राहिला आहे.




■ ‘क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ’ अर्थात ‘लसाकम’चे तरुण तडफदार विभागीय कार्याध्यक्ष——

महाराष्ट्राच्या मातंग समाजाला शिक्षण आणि विकासाचा मार्ग सांगणं आपलं काम आहे असं वाटणा-या कांही जाणकार मंडळींनी ‘लसाकम’ची स्थापणा करुन प्रत्यक्ष कार्य सुरु केलं ते मा संस्थापक अध्यक्ष शंकरराव आवचार यांच्या अध्यक्षतेखाली.
नंतर लातुरचे  माजी प्रदेशाध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर यांच्या नेतृत्वाखाली चळवळ महाराष्ट्रभर पोंचली.

निलंग्याचे  मा.प्रा.डॉ. भगवानराव वाघमारे, उदगीरचे मा.प्रा.डॉ. राजकुमार मस्के,आणि आता औरंगाबादचे  प्रा.संजय गायकवाड संघटनेची धुरा साभाळत आहेत.

या नव्या कार्यकारणीतुन पहिल्या पिढीने रिटायरमेंट घेऊन मार्गदर्शकाची भूमीका स्विकारली आहे.

संघटनेच्या मूळ  मसुद्याशी इमान राखून ही मंडळी सघ्या औरंगाबादचे धडाडीचे नेते प्रा.संजय गायकवाड अध्यक्ष आणि विभागीय कार्याध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे.

चळवळीच्या वतीनं ताजी ताजी चालवलेली स्मृतीदिन ते जयंतीदिन अशी १५ व्याख्याणांची मालीका प्राचार्य डॉ माधवराव गादेकर सरांच्या दिशादर्शक व्याख्यानाने सुरु झाली आणि या मालिकेचा यथोचित समर्पक समारोप मी केला.

या व्याख्यानमालेतल्या व्याख्यात्यांचा परीचय कधी बालाजी साकुंके तर कधी दयानंदजींनी आपल्या खणखणीत वाणीने करुन दिला.

ही समयसूचकता दयानंदजींमध्ये आणि बालाजी महोदयामध्ये ठासून भरलेली आहेच.विेभागीय कार्याध्यक्षाच्या अंगी लागणारी धमक दयानंद कांबळे यांच्या व्यक्तिमत्वात आहे त्या मुळे ते या पदावर शोभूनही  दिसतात.


■ ‘लहुजी शक्ती सेनेचे ‘राज्य प्रवक्ते———–




महाराष्ट्रभर समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारं हे संघटन आहे.आंदोलनं,मोर्चे काढून आपलं गार्हाणं शासन दरबारी मांडून समाजाला न्याय मिळवून देणारं हे काम आहे.

पुरोगामी विचाराची बुलंद तोफ’ हा किताब महोदयांनी कधीच समाज बांधवांच्या कार्यातुन कमावलेला आहे.

लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.विष्णू ( भाऊ ) कसबे, प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सोमनाथ (भाऊ ) कांबळे,विभागीय अध्यक्ष मा.प्रोफेसर.डॉ.दिलीप अर्जुने यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सद्गृहस्थ कार्यरत आहे.

हा कामाचा सपाटा पाहिला तर दयानंद महोदयाच्या अथक उर्जेचं कौतुक वाटतं आणि मग अभिमानही केल्यावाचुन रहावंत नाही.

■ लातूर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस :———–

हे पद महोदय मोठ्या ताकतीनं सांभाळत आहेत. मराठवाड्याचे लाडके शिक्षक आमदार मा. विक्रमबप्पांच्या कार्यशैलीवर महोदयांचं जिवापाड प्रेम आहे आणि सावली सारखा

हा माणुस बप्पांसोबत फिल्डवर काम करताना दिसतो मग ते वसंतराव साहेबांच्या स्मृतीदिनी होणा-या बप्पांच्या गावच्या साहित्य संमेलनातील मुख्य उद्घाटन सोहळ्याचं उद्घाटन असो नाही तर समारोप दयानंद महोदयांची समयोचितता प्रत्ययास येतेच येते.

भारदस्त आवाज आणि साहित्याचा व्यासंग यामळं दयानंद महोदयांकडं या जबबदा-या डोळे झाकून दिल्या जातात.

काम कुठलंही असो दयानंद महोदयाला येत नाही हा विषयच नाही. कायम तयार हे बिरुद या सद्गृहस्थानं कमावलं आहे.

‘कामाचा माणुस’ हा किताब खरा तर त्यांना आजवर बहाल व्हायला हवा होता चला तो या निमित्तानं या सदराच्या वतीनं बहाल करुयात.

आपली शाळा सुटल्यावर या तीनही पातळ्यांवर गडी लढताना दिसतो तेंव्हा मन भरून येतं.


■ ‘कोवीड यौद्धा पुरस्कार’ हा राष्ट्रीय सन्मान
————————————————–
कोविड-१९ मुळं माणुस माणसाच्या जवळ येईना झाला आहे.जगभर या विषाणुनं थैमान घातलं आहे.संसर्ग जन्य रोग असल्या कारणानं माणसं आपापल्या घरात कोंडल्या सारखे दिवस काढताहेत.

नगर आणि महानगरतली सगळी कामं बंद आहेत. आता पाच महिने पुर्णत्वाला आले आहेत. शासन अन्नपुरवठा करतं आहे त्यातुन गोरगरीब कसेबसे दिवस काढताहेत.

खायचं काय हा प्रश्न   अजूनही छळतो आहेच. जगायचं कसं हा गंभीर प्रश्न आहेच.शाळा महाविद्यालयं भरतील का, कसं होणाराय नेमकं कांही कळायला मार्ग नाही.शासन हतबल जाणवतं आहे.

अशा अवकळा आलेल्या काळात माणसांचा धीर बांधणं आणि त्यांचं मन केारोणाच्या चर्चेपासून दूर नेनं काळाची गरज आहे.

केजचे आमचे साहित्यिक बंधू मेजर हनुनंत भोसले सर फार जबरदस्त कार्य करताहेत लाईव्हच्या माध्यमातुन,थेट रस्त्यावरअॉटोत माईक घेऊन कोवीड संदर्भात केजच्या जनतेशी संवाद सांधून धीर देण्याचं काम करताहेत.

अगदीच याच धरतीवर लातुरच्यादयानंद कांबळे गुरुजींनी कोविड-१९ च्या गंभीर परिस्थितीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेसाठी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन

आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. उमेशजी चाफे भारतीय यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र आधार फाऊंडेशनच्या सन्माननीय सदस्या मा.कावेरीताई विभुते व मा.केशव बिरादार (लातूर ) यांच्या हस्ते मा. दयानंद कांबळे यांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आले.


यापुर्वीही दयानंद कांबळे या सद्गुणी शिक्षक बांधवाला  अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.

हा ताजा सन्मान त्यांच्या त्यागी,समर्पीत जीवनाचा परीचय करुन देणारा आहे.


■अभिनंदनाचा वर्षाव  ————

‘कोविड-१९ योद्धा’ हा समाजसेवेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मा. दयानंद कांबळे महोदयांचे शिक्षक आमदार मा. श्री.विक्रमजी काळे बप्पा,मा.श्री.मदन धुमाळ, ‘ लसाकम ‘ चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शंकरराव अवचार,

माजी प्रदेशाध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर,मा.प्रा.डॉ. भगवानराव वाघमारे,मा.प्रा.डॉ. राजकुमार मस्के,प्रा.संजय गायकवाड,मा.बालाजी साळुंके, मा.उत्तम मिसाळ, मा.उत्तमराव दोरवे, लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.विष्णू ( भाऊ ) कसबे, प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सोमनाथ (भाऊ ) कांबळे,

विभागीय अध्यक्ष मा.प्रा.डॉ.दिलीप अर्जुने, डॉ.सुवर्णा जाधव मा.सौ.मायाताई लोंढे, राम व्यंजने, मा.पंडीत हणमंते मा.बाबासाहेब बनसोडे आदींकडुन आपलं अभिनंदन केलेलंच आहे तेंव्हा आम्ही कविवर्य शेषराव शिंदे,

प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे, मा.उत्तमराव शिंदे, डॉ दयाराम मस्के ,रमेश मोटे, प्रा. अशीष कांबळे आपले मन:पुर्वक अभिनंदन करतो महोदय !आपल्या हातुन ही अशीच समाजसेवा घडत राहो !

दयानंदजी !आम्हाला आपला अभिमान वाटतो !


आपला,
▪प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे,संशोधन मार्गदर्शक,पदवी व पदव्युत्तर इंग्रजी विभाग प्रमुख,यशवंतराव चव्हाण महाविद्याल, 

अंबाजोगाई,जि.बीड.
Mob    : 9881294226E-mail : 
[email protected]


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *