कृषी सहायक संघटनेच्या कंधार तालुकाध्यक्षपदी विश्वास कदम तर सचिवपदी भुषण पेठकर यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेची दिनांक 1 मार्च रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार येथे नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून विश्वास कदम तर तालुका सचिव पदी भुषण शिवाजी पेठकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्हा प्रतिनिधी म्हणून संभाजी वडजे, तालुका कार्याध्यक्ष शिवा होनराव यांची निवड झाली यावेळी प्रदेश सचिव वसंतराव जरिकोटे साहेब, तालुका निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप काकडे साहेब, सहाय्यक तालुका निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पवार कृषी सहाय्यक सुनील देशमुख,जीवन कळणे,

बालाजी डफडे, सतीश वाघमारे , तालुका तंत्र व्यवस्थापक विनोद पुलकुंडवाड,अनुसया केंद्रे, उज्वला देशमुख, पल्लवी कचरे सह अन्य कृषी सहायकांनी पदाधिकार्यांची निवडीबद्दल स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *