मराठी माणसाच्या पाठीचा ‘कणा’ ताठ ठेवण्याचे कार्य कुसुमाग्रजांनी केले – कवी मुरहरी कराड

मराठी भाषा गौरव दिनाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या ‘ कविता : सौंदर्यशोध . आणि समीक्षा ‘ या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

अहमदपूर, ( प्रतिनिधी ) प्रा भगवान आमलापुरे


मराठी भाषेला संपविण्याचे काम पाश्चात्य संस्कृतीची भूरळ पडलेला शिक्षित वर्ग करीत आहे.परंतु ज्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन ‘ म्हणून साजरा केला जातो आशा कुसुमाग्रजांनी ‘पाठीवरती हाथ ठेवून फक्त लढ म्हणा ‘ अशा काव्याच्या माध्यमातून मराठी माणसाच्या पाठीचा ‘कणा’ मजबूत करण्याचे कार्य केले. असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध ग्रामीण तथा बालकवी मुरहारी कराड यांनी केले.


ते अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिन व प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या ‘ कविता : सौंदर्यशोध आणि समीक्षा ‘ या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.


यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवि मुरहरी कराड, कवि तथा समीक्षक डॉ.मारूती कसाब, कार्यक्रमाचे संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या ‘ कविता : सौंदर्यशोध आणि समीक्षा ‘ या ग्रंथाच्या प्रकाशन व मराठी विभागाच्या ‘ आविष्कार ‘ या भित्ती पत्रकाचे प्रकाशन ही करण्यात आले. तसेच याप्रसंगी पुढे बोलतांना मुरहरी कराड आपल्या काव्याच्या माध्यमातून म्हणाले की,


खेड्यामध्ये, पाडयामध्ये
रहाते माय मराठी,
पंढरीच्या वारी मध्ये
गाते माय मराठी,
सातासमुद्राच्या पलिकडे
हासते माय मराठी ‘
अशी ही आपली मराठी भाषा कधीच लोप पावणार नाही असे ही ते म्हणाले . तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर सुभाष साबळे यांनी –
स्त्री जातीच्या मुक्ती साठी,
आले महात्मा फुले ‘
त्यांनी स्त्री शिक्षणाची
दारे केली खुले…!’

हे शाहीरी गीत सादर करून श्रोत्यांकडून प्रचंड दाद मिळविली.


यावेळी डॉ.मारूती कसाब हे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या ‘ कविता : सौंदर्यशोध आणि समीक्षा ‘ या ग्रंथावर भाष्य करतांना म्हणाले की, समीक्षेच्या परंपरेला फाटा देऊन समाजाभिमुख साहित्याला मुख्य साहित्य प्रवाहात आणण्याचे कार्य महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक तथा समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. ते समीक्षण क्षेत्रातील खरे रत्नपारखीच आहेत.ज्यांनी अडगळीत पडलेल्या कविंना समीक्षेच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, संत, पंत, तंत, कवी, कथाकार यांचे जन्मदिवसच नाही तर मराठी माणसाने तीनशे पासष्ठ दिवस मराठी भाषेची आस्मिता जपली पाहिजे . असे ही ते म्हणाले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर सूत्रसंचलन कु. विश्वनंदा नंदवंशी ने व आभार कु. वैष्णवी मुंढे हीने मानले. यावेळी कु. ऋतुजा श्रीमंगले, कु. वैष्णवी मुंढे, कु. पूजा पोले, यांनी स्वागत गीत गायले तर यावेळी ज्येष्ठ कवी एन. डी. राठोड, प्रसिद्ध शाहीर सुभाष साबळे, माजी विस्तार अधिकारी वाय.डी. वाघमारे, भगवान अमलापूरे, संजय पवार , शेषराव ससाणे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यलयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्य संख्येंने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *