अनरिचेबल ” नावाच्या लघुपटाची फ्रान्स या देशात ” बेस्ट मोबाईल शॉर्ट फिल्म ” म्हणून निवड..
पहिलाच विदेशी फेस्टिव्हल आणि पहिलाच विदेशी पुरस्कार..
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
या लघुपटाची खास बाब म्हणजे हा एका शेतकऱ्यांच्या मुलाच्या आयुष्याची व्यथा मांडणारा १४ मिनीट ९ सेकंदाचा लघुपट असून याचे चित्रीकरण कंधार तालुक्यातील गोलेगाव , शेकापूर शिवारात पूर्ण करण्यात आले आहे. आणि त्यातुन आपल्याला एक सकारात्मक शेवट देतो . ही शॉर्ट फिल्म अवघ्या आठशे रु च्या निर्मितीमध्ये झाली आहे हे याची विषेश गोष्ट आहे .
याची निर्मिती शुभम जाधव यानी केली तर दिग्दर्शन आणि लेखन शुभम नागोराव केंद्रे यांनी केले आहे . शुभम केंद्रे यांचं फिल्म आणि लिखानाबाबतचे कोर्सेस व शिक्षण झाले असल्याने एक सिनेमाचा विद्यार्थी म्हणून ही मराठवाड्यातील लोकांसाठी अभिमानाची बाब आहे.
प्रमुख साहाय्य म्हणून अविनाश पाटील कळकेकर , मंगेश गवळे आणि सागर मंगनाळे यांनी यासाठी सहकार्य केले असून विशेष म्हणजे यात एकही संवाद नसून पूर्णपणे दृश्याच्या माध्यमातून हा लघुपट तयार करण्यात आला आहे . ही बाब नक्कीच फक्त कंधार तालुक्यासाठीच न्हवे तर महाराष्ट्र सह भारत देशसाठी अभिमानाची बाब आहे .
यापूर्वी याच लघुपटाने पाच पुरस्कार पटकावले असून पुरस्काराची घोडदौड चालूच असल्याचे दिग्दर्शक शुभम केंद्रे यांनी सांगितले. त्यांच्या यशाबद्दल संदिप सोनकांबळे , मिना सूर्यवंशी , यश सोनकांबळे , करण पवळे , तसेच कंधार तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी भेटलेल्या पुरस्कार बद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.