गावकऱ्यांतर्फे शिक्षकाचा सत्कार ही ऐकमेकाद्वीतीय घटना होय – बाबुराव केंद्रे ..! पांडुरंग आमलापुरे यांचा मोटरगा वासीयातर्फे सत्कार.


अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

एखाद्या शिक्षकाचा सेवानिवृत्ती निमित्ताने शाळेने रितसर सत्कार केल्यानंतर सबंध गावकऱ्यांतर्फे त्याच शिक्षकाचा विशेष सत्कार आयोजित करणे ही संस्थेच्या इतिहासातील ऐकमेकाद्वीतीय घटना होय. असे प्रतिपादन रामक्रष्ण महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री बाबुराव केंद्रे यांनी केले.


श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय मोटरगा येथील सहशिक्षक पांडुरंग कि आमलापुरे हे नियत वयोमानानुसार दि २८ फेब्रु २२ रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मु अ कदम सर, मु अ बी एस मुंडे सर, मु अ श्री धुळगुंडे सर, मु अ श्री गुट्टे सर, एन डी राठोड आणि शिवकुमार सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलताना श्री केंद्रे म्हणाले की आजची सत्कारमुर्ती पांडुरंग आमलापुरे विद्यार्थ्यांसोबतच गावकऱ्यांसोबतही रमले. त्यामुळे त्यांचा सत्कार गावकरी करणार आहेत. असे सांगून त्यांनी पुढील काळात सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


श्री एन डी राठोड आपल्या मनोगतात म्हणाले की सेवानिवृत्तीच्या सत्काराचा हा कार्यक्रम सुरु होऊन आडीच तास झाले आहेत.तरीही विद्यार्थ्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. शिवाय पेंडालच्या बाहेर झाडाच्या पातळ सावलीत शांतपणे कार्यक्रम पाहत आणि ऐकत बसलेले आबालवृद्ध हे आमलापुरे सरांवरील त्यांचे प्रेमच दाखवून देत आहेत. त्याहून जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व गावकऱ्यांनी त्यांचा एक वेगळा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

यावेळी त्यांनी आपली निरोप समारंभावरील ” वाटा ” ही कविता सादर केली. येणाऱ्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आणि समाज कार्यासाठी सरांना शुभेच्छा दिल्या.
सत्कारास उत्तर देताना पांडुरंग आमलापुरे म्हणाले की विषयावर तर माझी पकड आहेच, पण घरच्या लेकराइतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त तळमळीने मी विद्यार्थ्यांना शिकवीलो आहे.आग्रहाने ग्रहपाठ करून घेतला आहे. यावेळी त्यांनी संस्था, आजी माजी सहकारी, आजी माजी विद्यार्थी आणि उपस्थित गावकऱ्यांचे ऋण व्यक्त केले.


मोटरगा व्यतिरिक्त खतगावचे सरपंच शिवाजीराव खतगावकर, हिब्बटचे हाणमंत घुमलवाड, प्रकाश नाईक, एकलारचे गणपतराव सोनकांबळे, आदर्श विद्यालय हंगरगा येथील शेख सर, मुखेडचे गजानन गोपतवाड, मुजाहिद्द शेख आणि किरण कन्नडे यांची उपस्थिती होती.


गावकऱ्यांतर्फे बालाजी पाटील भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गंगाधर देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन सुर्यकांत मुंडे यांनी तर आभार सुरेश वजीरगावे यांनी मानले.


दरम्यान ,पांडुरंग आमलापुरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आज शुक्रवार दि ०४ मार्च २२ रोजी मोटरगा येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात सर्व गावकऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार आणि सुरुची भोजनाचे आयोजन बालाजी पाटील भिसे आणि रघुनाथ जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *