मालेगाव: प्रतिनिधी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक पी.एम. सूर्यवंशी हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे सेवानिवृत्त सचिव आणि माजी सनदी अधिकारी,अभिनेते, लक्ष्यवेध फाउंडेशनचे अध्यक्ष एकनाथ उर्फ अनिल मोरे,महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्राला नवा आयाम देणारे शिक्षकांचे प्रेरणास्त्रोत डॉ. गोविंद नांदेडे, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, साहित्यिक, व्याख्याते,प्रा.डॉ. हनुमंत भोपाळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. शिवाजीराजे पाटील, सरपंच अनिल इंगोले,वृक्ष मित्र फौंडेशनचे कार्यकर्ते ईश्वर पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले, संस्थाचालक शिवराम पांचाळ ग्राम पंचायत सदस्य स्वामीजी यांची समारोप प्रसंगी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गोविंद नांदेडे म्हाणाले , शिक्षक हे राष्ट्रनिर्माते असून शिक्षकांनी ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत विद्यार्थ्यांना ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी परावृत्त करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशाचे भवितव्य हे इतर कुठेच घडत नाही तर ते शाळेच्या चार भिंतीत घडते. हे त्यांनी उदाहरणासह पटवून दिले.
यावेळी माजी सनदी अधिकारी आणि अभिनेते एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी शिवा कांबळे यांनी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून ते खऱ्या अर्थाने ध्येयनिष्ठ आणि ध्येयवेडे कार्यकर्ते शिक्षक असून त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करत शिवा कांबळे यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव केला.
सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे यांनी शिवा कांबळे यांना मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार हा ख-या अर्थाने सार्थकी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी प्रा.डॉ. हनुमंत भोपाळे यांनी व्यक्तिमत्त्व विकास याविषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.जिद्दीच्या जोरावरच सिद्धी, साध्य प्राप्त करता येते.असंख्य माणसांनी प्रतिभा आणि परिश्रमाच्या बळावर नव विश्व निर्माण केले आहे.
जसे अंधार आहे म्हणून रडत बसल्याने अंधार दूर होत नसतो दिवा लावला की, दूर होतो तसे ध्येय ठरवून त्या दिशेने झपाटून वाटचाल केली की,यश प्राप्त होते असे प्रतिपादन त्यांनी केले.शिवाजीराजे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी असा मौलिक सल्ला देऊन राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी सुरू केलेल्या रात्रीच्या अभ्यास वर्गाचे कौतुक केले.
यावेळी रात्रीच्या अभ्यास वर्गाचे संयोजक शिवा कांबळे व गिर्यारोहक ओमेश पांचाळ यांचा लक्ष्यवेध फाउंडेशनच्या वतीने डॉ हनुमंत मारोतीराव भोपाळे लिखित यशाचा राजमार्ग हा ग्रंथ देऊन अभिनेते एकनाथ उर्फ अनिल मोरे, डॉ. गोविंद नांदेडे, शिवाजीराव कपाळे, प्रा.डॉ. हनुमंत भोपाळे, शिवाजीराजे पाटील व प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक पी.एम. सूर्यवंशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्रीती हनुमंते,अश्विनी शिवभगत या दहावीतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती वाघमारे हिने केले तर आभार रात्रीच्या अभ्यास वर्गाचे संयोजक शिवा कांबळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल व रात्रीच्या अभ्यास वर्गास पाठबळ दिल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक पी.एम. सूर्यवंशी, सौ.सुलोचना कामजळगे/नांदेडे,व सौ.अनुजा देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिका सौ. अनुजा देशपांडे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील शिक्षक श्रीकांत शिंदे,रावसाहेब पुप्पलवाड, विनायक जमदाडे यांच्यासह शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते .