मन्याड खोर्‍यातील ढाण्या वाघाची विधानसभेत फोडली भाषणातून डरकाळी, शासनाची उघडली कानठळी!

कंधार 

मन्याड-गोदावरी खोर्‍याचे आपल्या परखड विचाराच्या भाषणाने,तुकाईच्या माळाचे अप्पर मानार प्रकल्प होण्यासाठीच साठच्या दशकात प्रयत्नांची पराकाष्ठा केली.पण सत्तेच्या नशेत बेधुंद सत्ताधार्यांनी राजकिय सूड उगवून डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या मतदारसंघाला कवडी कंगाल करुन राजकिय स्वार्थ साधण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन वरवंट चे लोअर मानार प्रकल्प अट्टाहासाने पुर्ण करतांना मन्याड खोर्‍यातील 3500च्या वर प्रकल्प विरोधी सत्याग्रहीवीरांनी जेल भोगुन विरोध करत मन्याड थडीची

मर्दुमकी दाखवून,अख्या महाराष्ट्राला ओळख करुन दिली.
कंधार म्हणटले की,महाराष्ट्रात चळवळीचे अन् डाॅ.भाई केशवराव धोंडगे याचे कंधार सुपरिचित आहे.गेली 30 वर्ष आमदारकी अन् अडीच वर्ष खासदारकीचे प्रतिनिधित्व करतांना अनेक समाजहिताचे प्रश्न विचारुन तत्कालीन देशाच्या संसदेत आणि महाराष्ट्र विधानसभेत आपल्या ओजस्वी, गगनभेदी भाषणाच्या डरकाळ्यानी शासनाची कानठळी उघडत स्थगन प्रस्ताव, हक्कभंग प्रस्ताव, तारांकित प्रश्न, आयत्यावेळेचे विषय,तोंडी व लेखी उत्तरे मिळवून आपली समाजाप्रती संवेदना जागृत ठेवली.कामकाज सुरु होण्याआधी सर्वात प्रथम प्रवेश करुन कामकाज संपतांना शेवटी ही त्याच्या कार्यप्रनालीची खुबी होती.

आज दि 15/3/2022 रोजी कंधार शहरातील छ.शंभूराजे इंग्लिश मीडियम स्कूल वीर नागोजी नाईक चौक येथील ज्ञानालयात डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्तर वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र विधानसभेत बजावलेल्या भाषणाच्या कामगिरीवर 12 खंड संत योगिराज निवृत्त महाराज यांची पुण्यभुमी म्हणजे सेलू पेंडू येथे 23 डिसेंबर 2019 रोजी प्रकाशित केले गेले.त्या खंडाच्या वर्गीकरणासाठी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे अध्यक्ष मा. डाॅ.प्रा.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या संकल्पनेतून कार्य आरंभ झाले आज पर्यंत पाच-सहा बैठका पार पडल्या.

शेवटची बैठक सुरु असतांना आचानक मा.खासदार व मा.आमदार,सर्वांचे प्रेरणास्त्रोत विद्रोही विचारवंत, सुग्या-मुग्याचे कैवारी,मुक्ताईसु डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांचे आगमन होताच सर्वांच्या आनंदास पारावार उरला नाही.त्यावेळी उपस्थितांना हर्षानंद झाला.यांनी सखोल मार्गदर्शन केले…साहेबांचे वय १०२ वर्षे आहे..तरी साहेब चेष्मा न लावता वाचन करतांना…..!.

त्यांचे विचार मांडतांना खणखणीत आवाज,तीच ढब, तोच सडेतोडपणा,तीच धमक आजही कायम आहे…..!सर्वांनी खंडातील भाषणांचा  बारकाईने निरीक्षण कले…
प्रा. डॉ. पुरुषोत्तम यांनी प्रत्येकांचे कामकाज डाॅ.भाई साहेबांना दाखवले..
त्यानंतर डॉ. भाई केशवराव धोंडगे साहेबांनी सर्वांचे कौतुक केले…त्यांनतर सर्व सहकार्याचे खंडात सोबत छायाचित्र घेतले.डॉ. केशवराव धोंडगे साहेबांची
विधानसभेतील भाषणे या
ग्रंथाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे..येणाऱ्या काळात नव्या पिढीने नेतृत्व कसे करावे… प्रश्न कसे मांडले जावीत…अभ्यासपूर्ण मांडणी कशी करावी..विधानसभेत तांराकित प्रश्न अन्यायाच्या विरुद्ध कसेशपेटून उठावे…असा हा वाचनीय
गौरव ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार आहे.

डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या कार्यकतृत्वाला मानाची कोटी-कोटी जयक्रांति.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *