कंधार प्रतिनिधी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत मौजे हळदा येथील गट क्रमांक 693 मध्ये शेतकरी कैलास मंदावाड यांच्या शेतामध्ये ढाळीचे बांध या कामाचे भूमिपूजन युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, व मौजे हाळदा या गावांमध्ये एकूण 285 हेक्टर क्षेत्रावर उपचाराची कामे मंजूर असून ही कामे 17. 56 लक्ष रुपयाची आहेत, तसेच मौजे दहिकळंबा येथील उमराव सिंग गोविंद सिंग राठोड यांचे गट क्रमांक 205 मध्ये ढाळीचे बांध कामाचाही शुभारंभ विक्रांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

मौजे दहिकळंबा येथील एकूण आठ गटांचे मिळून 594 हेक्टर क्षेत्रावर ढाळीचे बांध क्षेत्र उपचाराचे कामे मंजूर असून त्याची रक्कम 23.494 लक्ष रुपये आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे प्रमुख उपस्थित होते, यावेळी राजू पाटील हळदेकर, कंत्राटदार गणेश पाटील उमरेकर,शेतकरी ओम सिंग राठोड, विठ्ठल शंकरराव शिंदे, तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर, मंडळ कृषी अधिकारी रमाकांत भुरे ,कृषी पर्यवेक्षक श्रीराम वारकड, कृषी सहाय्यक उबाळे , कृषी सहाय्यक बालाजी डफडे सह शेतकरी,कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.


