कौठा येथे आज साईबाबा मंदिर भुमीपुजन सोहळा

कंधार ;

साई भक्तांना व पंचक्रोशीतील परिसरातील लहान-थोर माताभगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की दिनांक 20 / 3 /2022 रोजी रविवारी ठीक दोन वाजता साईबाबा मंदिर बांधकाम भुमिपुजन सोहळा गडगा रोड साईगड कौठा ता कंधार येथे आयोजित केले आहे

.
तरी सर्व जनतेने या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून साई महाप्रसादाचा चुलबंद सहकुटुंब लाभ घ्यावा.या महाप्रसादाचे आयोजन उद्योजक गौतम जैन यांच्या कडून करण्यात येत आहे.तसेच साईबाबांची मूर्ती पण शांतीलाल जैन यांच्याकडून भेट देण्यात येत आहे. या सोहळ्यास संत-महात्मे म्हणून श्री भिवपुरीजी महाराज कुर्तडीकर,
तसेच दत्तगुरु महाराज काहाळेकर, श्री जीवन दासजी महाराज चुडावा, सिद्धदयाजी महाराज बेटमोगरा, संतनाम साहेब बाबाजी गुरुद्वारा नांदेड, तसेच किशोर जी महाराज धर्माबाद, यांची उपस्थिती राहणार आहे
तरी सर्व साई भक्तांना विनंती व्यंकटराव घोरपडे यांच्या विनंतीस मान देऊन आपन सर्वानी महाप्रसाद घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


तसेच या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील राजकीय-सामाजिक शासकीय-निमशासकीय पदाधिकारी म्हणून प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे व्यंकटराव घोरपडे यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *