एसआरपीएफ हवालदार राजीव देविदास मुंडे यांचा शाॅक लागून मृत्यू

कंधार

औरंगाबाद येथे हवालदार पदावर कार्यरत असलेले तालुक्यातील पाताळगंगा येथिल हवालदार पदावर कार्यरत असलेले राजीव देविदास मुंडे बांधकामांच्या अनुषंगाने ते गावी आले होते त्यांच्या घरावरील विजेची मेन लाईन डी पी कडे जाणारी होती त्याला आज शनिवार दि.१९ मार्च रोजी स्पर्श होवून शाँक लागला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला .

औरंगाबाद येथे हवालदार पदावर कार्यरत असलेले राजीव देविदास मुंडे
पातळगंगा ता. कंधार जि नांदेड येथील रहिवासी आहेत . घराच्या कामानिमित्त गावी आले होते ते (SRPF ग्रुप नंबर 14 औरंगाबाद ) येथे हवालदार पदावर कार्यरत होते.

सध्या गावात तुकाराम बीज निमित्त दरवर्षी प्रमाणे सप्ताह चालू आहे त्यातच हि दुर्दैवी घटना घडल्याने गावात शोकाकुल वातावरण झाले आहे. अंत्यविधी उद्या रविवार सकाळी २०-०३-२०२२ सकाळी ठिक ८ वाजता पाताळगंगा येथे होणार आहे

मयत राजीव देविदास मुंडे त्यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, दोन बहीणी, पत्नी- एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *