गऊळ गावचे भूमिपुत्र श्रीकांत प्रल्हाद गिरे व सोपान तुकाराम केंद्रे यांची पोलीस कॉन्स्टेबल नागपूर येथे निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार


गऊळ


शंकर तेलंग

गऊळ तालुका कंधार येथील आज श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने काल्याच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमच्या गावातील गरीब घराण्यातील शेतकरी वर्गातून कुटुंबातून आलेले हे दोन मुलं त्यांना पोलीस कॉन्स्टेबल नागपूर शहर आयुक्तालय येथे सोपान तुकाराम केंद्रे तसेच श्रीकांत प्रल्हाद गिरे यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे गावातील ग्रामपंचायत कार्यालय वतीने तसेच सरपंच संभाजी श्यामराव तेलंग यांनी त्यांच्या आई-वडिलांचा आणि त्यांचा मोठ्या उत्साहाने सत्कार केला.


त्याच वेळेस संभाजी पाटील तेलंग यांनी आदर्श व्यक्तिमत्व कसा असावा शिक्षणा शिवाय पर्याय नाही. मुलांना शिका. अभ्यास करा. मोठ्या पदवीवर आपण नोकरी करा, व्यसनाधीन नसावे. अशा अनेक मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. त्यावेळेस उपस्थिती बीज गुलालाच्या किर्तनाचे कीर्तनकार ह.भ.प. श्री संभाजी महाराज हिब्बटकर यांची उपस्थिती होती. तसेच संग्राम महाराज, पंडित तेलंग, बालाजी गिरे, दिगंबर तेलंग हौसाजी जायभाये, हनुमंत तेलंग, प्रल्हाद तेलंग, विठ्ठल भंडारे, नारायण पितळे गुरुजी, विठ्ठल पाटील तेलंग ,शिवाजी गिरे, पांचाळ सर, गावातील महिला पुरुष थोर भाविक भक्त या कार्यक्रमाचे उपस्थिती होती.


कार्यक्रमाची नियोजन सरपंच संभाजी शामराव पाटील तेलंग उपसरपंच उद्धव गुट्टे तंटामुक्ती अध्यक्ष नहनू गुट्टे, ग्रामपंचायत सदस्य गंगाधर वडजे, बालाजी रंगवाड, नारायण जायभाये, आदी सदस्य उपस्थिती होती गावातील समस्त गावकरी मंडळी भावी भक्तांचे उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *