एक सुंदर दृश्य…

 

तीन / चार दिवसांपूर्वी आम्ही पिकनीकला एका स्पॉटला जात होतो.. नेहमीप्रमाणे गुगलबाईने आम्हाला कुठल्यातरी गावातून फिरवलं कदाचित हा लेख मी लिहावा म्हणुनच असेल.. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावात आमची गाडी गेली आणि तिथे पारावर बसलेल्या मुलांना आम्ही पत्ता विचारायला काच खाली घेतली आणि ते दृश्य पाहून मनापासून आनंद झाला कारण गेल्या कित्येक वर्षात असं दृश्य पहाण्यात आलं नव्हतं.. डावीकडे पाहिलं तर बांधावर चार पाच जण गप्पा मारत होते. गाडी वळवायला थोडं पुढे गेलो तर ओसरीवर ४/५ बायका काहीतरी निवडत गप्पा मारत होत्या.. असं वाटलं होतं गाडीतून खाली उतरावं आणि त्यांना शाबासकी द्यावी कारण एकाच्याही हातात मोबाईल नव्हता.. किती सुंदर दृश्य होतं ते.. आमच्या गावातलं आमचं बालपण आठवलं .. तेव्हाही दिवसाचे २४ च तास होते पण शेतातील कामं, घरातील कामं आणि अभ्यास यात वेळ पुरायचा नाही आणि आता कामधंदेच नाहीत की काय असं बऱ्याचदा वाटतं.. सुशिक्षित रिकामटेकडे अशी उपाधी आपणच आपल्याला द्यावी.. यालाच व्यसन म्हणतात .. यावर बरेचजण बोलतात , बरेचजण लिहीतात .. उपाय कोणीही सुचवत नाही आणि उपाय माहीत असला तरीही आपल्याला यापासून बाजूला व्हायचे नाही .. व्यसनं ही अशी आपली पाठ सोडत नाहीत तर त्यांना हुसकून लावावं लागतं.. त्यासाठी आपल्याला बदलायची तयारी हवी..
यासाठी मी काय करते ??.. मला मनापासून जप करायला आवडतो त्यामुळे दिवसाला जवळपास १६ माळा नामस्मरण करते.. व्यायामाची प्रचंड आवड त्यामुळे रोजची टेकडी चढते.. श्रवण करायला खुप आवडतं त्यामुळे अनेक जणाना मी आलटूनपालटुन ऐकते.. वाचायला खुप आवडतं त्यामुळेच सतत काहीना काही वाचते.. भगवद्गीता जवळपास रोज एक तरी श्लोक आणि त्याचा अर्थ वाचते… घरातल्या कुठल्याही कामाला बाई न ठेवता सगळी कामे स्वतः करते अगदी सचिन सुध्दा करतो.. त्याशिवाय रोजचं लिखाण आहेच.. याव्यतिरिक्त माझ्या लाडक्या मित्रांना घेउन घरी किवा आमच्या अड्ड्यावर मैफिल भरवते.. गप्पा , कॉफी आणि त्यात भांडण रुसवाफुगवा सगळच.. रोज काउन्सिल असतातच.. सगळ्या कार्यक्रमाना मी जात नाही.. मला आवडणाऱ्या ठिकाणी मी जाते.. निसर्गात भरपुर फिरते.. पार्ट्यना जाऊन मी माझा मौल्यवान वेळ आणि पैसा वाया घालवत नाही त्यापेक्षा मंदिरात जाते.. नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतात त्यामुळे ते करते.. नवनवीन माणसं जोडायचा प्रयत्न असतो.. सोशल मिडीयावर चॅटींग कधीही करत नाही.. कोणीही पाठवलेलं चांगलं नक्की वाचते त्यातून उत्तम असेल ते माझ्यात उतरवायचा प्रयत्न करते.. नवऱ्याशी भांडणात किवा संशय घेण्यात वेळ घालवत नाही त्यामुळे माझा मौल्यवान वेळ वाया जात नाही.. इतके सगळे उद्योग करताना वेळ उरतच नाही आणि काय करु हा प्रश्न पडतच नाही.. आपलं रुटीन आपण लावून घेतलं तर सगळं करुन आपण सोशल मिडीयावर काही वेळ चांगल्यासाठी नक्कीच घालवू शकतो.. आता १० दिवस नेट बंद ठेवून यात्रेला जाऊन आले त्यामुळे माझा माझ्यावरचा कंट्रोल कळला.. गरजेपेक्षा कसलीही साठवण नाही त्यामुळे चोरीला जायची भिती नाही किवा ते सांभाळण्याचं टेंशन नाही.. नोकरी करणाऱ्याचं रुटीन वेगळं असु शकतं उलट त्यांना वेळा पाळणं जास्त सोप्पं आहे कारण ऑफीस वेळ ठरलेली असते.. अवघड काहीही नाही.. फक्त बदलाची तयारी हवी.. कट्टे जमवा.. मैफीली सजवा.. एकत्र या म्हणजे मानसिक रुग्ण व्हावं लागणार नाही.. मस्त जगा अगदी माझ्यासारखं.. आणि काही काळ या डबड्यापासुन दुर रहा..
सोच बदलो.. देश बदलेगा..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *