अहमदपूरात आज राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण, व्याख्यान आणि निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन.


अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

येथील कराड नगरस्थीत पुरोगामी विचारांच्या आणि विज्ञाननिष्ठ दष्टीकोन असणाऱ्या राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था, अंतर्गत निडको इडीबी प्रशिक्षण केंद्र अहमदपूरच्या वतीने आज रविवार दि २० मार्च २२ रोजी पुरस्कार वितरण, व्याख्यान आणि निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या त्रिवेणी कार्यक्रमाचे उद्घाटन मा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ प्रा डॉ पदमा जाधव असणार आहेत.

तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निव्रती कांबळे, जि प सदस्य माधव जाधव ,सभापती क्र उ बा शिवानंद तात्या हेंगणे, राँकाँचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, संजय गांधी निराधार सदस्य फेरोज शेख, राँकाँचे युवा जिल्हा उपाध्यक्ष युवराज बदने,प्रोग्राम मँनेजर निडको, प्रा विनोद ससाणे, सरपंच सौ वंदनाताई केंद्रे रूद्धा, पोलिस निरीक्षक महामार्ग अरूण केंद्रे आणि सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ सदाशिव केंद्रे उपस्थित राहणार आहेत.


उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात,’व्यसन : मानवी समाजाला लागलेला महाभयंकर रोग ‘ या विषयावर प्रा डॉ पदमा जाधव अभ्यासपुर्ण मांडणी करणार आहेत. प्रास्ताविक राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेचे संचालक शाहीर सुभाष साबळे तर सुत्रसंचालन प्रा शितल प्र लुलेकर या करणार आहेत. व्याख्यानानंतर लगेचच सौ प्रा सविता दुधभाते पंढरपूर, शालु तरमुडे लातूर, शरद चेके बुलढाणा, वामनराव जाधव परळी वै, शेषराव ससाणे अहमदपूर, ज्ञानदेव जगताप हिंगोली, प्रा अतुल मुळे बीड, प्रदिप झनके बुलढाणा, दिपक कांबळे अहमदपूर, अण्णाराव सुर्यवंशी अहमदपूर, देविदास सातपुते अहमदनगर, अनिता पिंपळे अहमदनगर, शरद तळेकर बीड, देविदास कांबळे अहमदपूर,

दगडू ढवळे धानोरा खु, पत्रकार – कवी त्रिशरण मोहगावकर, कवी महेश कोरडे गंगाखेड आणि कवी रामेश्वर किरडे पाटील चाटोरी ता पालम यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.


दुपारच्या सत्रात दुपारी दोन वाजता निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे उदघाटन जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड यांच्या हस्ते होणार आहे.प्रा डॉ मारोती कसाब हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रास्ताविक प्रदिप गिरी करणार आहेत. वाय डी वाघमारे, प्रफुल्ल धामणगावकर, शमशोद्दीन अहेमदपुरी, शिवा कराड, शाहीर सुभाष साबळे, मु अ आशा रोडगे, संजीवकुमार भोसले, प्रा भगवान आमलापुरे, वैजनाथराव कांबळे, मिनाक्षी तौर, कवी शिवाजीराव नामपल्ले, पत्रकार – कवी त्रिशरण मोहगावकर आणि ‘ हिसाळाकार ‘ मुरहारी कराड पारकर यांचा सहभाग असणार आहे. कविसंमेलनाचे आभार संस्था सचिव वर्षा गवळे माननार आहेत.

व्याख्यान आणि कविसंमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *