धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
कोरोना या जागतिक महामारीने आपल्याला शरीर आणि निरोगी आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून आरोग्याचे अधिकाधीक संरक्षण आणि संवर्धन व्हावे. असे प्रतिपादन जय भगवान सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवाजीराव गुट्टे यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद संलग्नित आणि जय भगवान सेवा भावी संस्था धर्मापुरी संचलित कै शंकरराव गुट्टे ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विशेष रासेयो शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ टी एल होळंबे सर होते. यावेळी व्यासपीठावर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा एन एस चाटे आणि ओ एस संभाजी अंबेकर उपस्थित होते.
मौजे हाळम येथे हा उदघाटन कार्यक्रम पार पडला. या वर्षीच्या रासेयो विशेष शिबिराचा विषय,’ आरोग्य आणि पर्यावरणासाठी युवक ‘ असा आहे. दोन वर्षाच्या कोरोना नंतर प्रत्यक्षात हे पहिलेच विशेष शिबिर आहे.दि १९ मार्च ते २५ मार्च २२ पर्यंत हे शिबिर चालणार आहे.
पुढे बोलताना डॉ शिवाजीराव गुट्टे म्हणाले की रासेयो स्वंयसेवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यासाठी अधिकचे प्रशिक्षण या शिबिरातून घ्यावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन प्रा डॉ पी डी मामडगे सर यांनी केले. आभार प्रा अविनाश मुंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तु मुंडे, बळी नाना आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी परिश्रम घेतले. राष्ट्र गीताने या उदघाटन कार्यक्रमाची सांगता झाली.