सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार”वितरण सोहळ्यात कंधार तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांचा सन्मान ;सौ निलीमा यंबल व हनमंत जोगपेटे यांना केले सन्मानित

कंधार

कुसुम सभागृह नांदेड  येथे  रविवार दि 3 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार”वितरण  सोहळ्यात कंधार तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांचा सन्मान माजी आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाला

   सौ निलीमा यंबल यांची जि प प्रा शाळा पानशेवडी  व जि.प. प्रा शाळा वळसंगवाडी शाळेचा हनमंत जोगपेटे यांचा सन्मान मा.आ.कपिल पाटील यांच्या शुभहस्ते आज कुसुम सभागृह नांदेड येथे झाला.

यावेळी
जि .प .प्रा.शा.पानशेवडी
शाळेच्या  मुख्याध्यािपका सौ निलीमा यंबल  ,श्री ताटे सर ,प्रजाल शिंदे  ,दत्ता मुंढे  ,आर.एन केंद्रे  ,मरशिवणे  ,सौ उमाटे मॅडम , कैलास गरुडकर आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.

तसेच शिक्षक भारती नांदेडच्या वतीने “सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार”वितरण सोहळ्यात  शाळा जि प प्रा शाळा वळसंगवाडी शाळेचा सन्मान मा.आ.कपिल पाटील यांच्या शुभहस्ते आज कुसुम सभागृह नांदेड येथे  झाला .

यावेळी शाळेचा स्टाफ व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच मित्रमंडळी यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *