जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून ब्रँच मुखेड शाळेचा सन्मान


मुखेड: दादाराव आगलावे


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्षक भारती नांदेडच्या वतीने जिल्ह्यातील निवडक सर्वोत्कृष्ट शाळांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.शिक्षक भारतीचे संस्थापक आ.कपिल पाटील यांच्या शुभहस्ते ब्रँच शाळेचे मुख्याध्यापक दिलीप किनाळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर पाटील,ब्रँच केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी कराळे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांना कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित केलेल्या समारंभात जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच मुखेड या शाळेत म्हणून सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी शाळेच्या राज्यस्तरीय लेझीम पथकाने सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

मुखेड शहरातील सर्वात जुनी व उपक्रमशील शाळा म्हणून ब्रँच मुखेड या शाळेचा नावलौकिक असून सध्या या शाळेची पटसंख्या 850 असून 32 शिक्षक त्यांना अध्यापन करतात.या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतही शाळेने उत्तम यश मिळवलेले आहे.काही महिन्यापूर्वी या शाळेचा समावेश राज्य शासनाच्या राज्यातील निवडक आदर्श शाळेमध्ये करण्यात आला असून शाळेची उत्कृष्टतेकडे वाटचाल चालू आहे.

शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कडकंजे,सौ.सुनिता आलमले, माधव माधसवाड,मोहमद अत्तार, संगमनाथ पवरेकर,सौ.रेखा तमशेट्टे,सौ.अश्विनी देशपांडे,भारत सिंगणवाड,सौ.सुनीता सूत्रावे,सौ.सुनीता पाटील,रमेश आचमारे,सौ.सुरेखा स्वामी,अरविंद थगणारे,रामराव चव्हाण,सौ.संतोषी मेडेवार,सौ.रेखा दिनकर,अशोक तलवारे,बबिता घेरे,सौ.संगीता पाटील,श्रीमती मनीषा पाटील,शरद डावकरे,बस्वलिंग काळवणे,सौ.सुजाता बिरादार, सौ.नागसेना येवतीकर,सौ.स्वाती गुणाले,सौ.सरस्वती शिंदे,सौ.सारिका होनवडजकर,कैलास कोंडलवाडे,सौ.उषा मेडाबलमेवार,सौ.रत्नमाला मळभागे यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्धल व
शाळेच्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे,प्रियदर्शिनी विद्या संकुल नांदेडचे संचालक श्री.बालासाब माधसवाड,सौ.शिवनंदा ईरबतनवाड,प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे,शाळा व्यवस्थापन समिती ब्रँच मुखेड यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *