कंधार
श्रीराम जन्मोत्सवा निमित्त श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने गुढीपाडवा ते रामनवमी या नऊ दिवसात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ,या उत्सवादरम्यान गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त महाआरती भजन संध्या घेण्यात आली तसेच ६ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान योग शिबिराचे आयोजन नागरेश्वर मंदिर येथे करण्यात आलेले आहे,
श्रीराम नवमी निमित्त दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता नगरेश्वर मंदिर येथे पालखी पूजन ,दुपारी बारा वाजता श्री राम मंदिर येथे साधू संत महंत व मान्यवर यांच्या उपस्थितीत श्री राम पूजा व पादुका पालखी पूजन,उत्सव मूर्ती पूजन करण्यात येणार आहे व सायंकाळी चार वाजता श्रीरामाच्या भव्य मूर्तीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभायात्रेत भजनी मंडळ
,संस्कृतीक वाद्य ,उत्सवमूर्तीचा समावेश राहणार आहे .श्रीराम नवमी निमित्त दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता नगरेश्वर मंदिर येथे पालखी पूजन ,दुपारी बारा वाजता श्री राम मंदिर येथे साधू संत महंत व मान्यवर यांच्या उपस्थितीत श्री राम पूजा व पादुका पालखी पूजन,उत्सव मूर्ती पूजन करण्यात येणार आहे व सायंकाळी चार वाजता श्रीरामाच्या भव्य मूर्तीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभायात्रेत भजनी मंडळ ,संस्कृतीक वाद्य ,उत्सवमूर्तीचा समावेश राहणार आहे .
ही शोभायात्रा श्रीराम मंदिर ते श्री स्वामी समर्थ मंदिर इथपर्यंत शहरातील मुख्य रस्त्याने जाणार आहे त्यानिमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती कंधार च्या वतीने संपूर्ण शहरात भगवे पताके लावून मुख्य स्त्याला सुशोभित करण्यात आलेली आहे या शोभायात्रेत जास्तीत जास्त राम भक्तांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने अड गंगाप्रसाद यन्नावार ,निलेश गौर, अजय मोरे ,अड सागर डोंगरजकर, अभिजीत इंदुरकर ,रवी केंद्रे, संदीप व्यास ,प्रवीण बनसोडे,शुभम संगनवार,रवी संगेवार, किशन कळणे,शेखर वडजकर,सचिन पेठकर,मनोज कांबळे,रामदास बाबळे,बालाजी निलावाड, आकाश आवाळे, राजु श्रीमंगले,भूषण पेठकर,महेश घाटे,सागर येईलवाड,संकेत अंबेकर,गणेश ठाकूर,राजू मठपती,माधव जाधव,तरकेश तपासे,गजानन,तोडली,पिंटू ठेवरे,रजत शाहपुरे यांनी केले आहे .