फुलवळ ( प्रा भगवान आमलापुरे )
गुरू बंडया स्वामी मठ संस्थान, गुरू गल्ली फुलवळ येथे हा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी लक्ष्मण महाराज स्वामी, गणपतराव फुलवळे, परमेश्वर स्वामी, सत्कारकर्ते विजयकुमार सादलापुरे,सौ आशाताई वि सादलापुरे,ज्ञानेश्वर पोतदार, कैलासराव डांगे, पांडुरंग शेळगावे, श्रीमान पळसकर आणि आईनाथ डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शि भ प सौ शिवकांता पळसकर यांचा महावस्त्र ,श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तर श्रीमान पळसकर यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी श्री आणि सौ सादलापुरे यांनी व्हाट्सएप ग्रुप वर्गमित्र बँच १९९२ – ९३ तर्फे पुढाकार घेतला. आणि सत्कार समारंभ घडवून आणला.
शि भ प सौ पळसकर यांचे फुलवळ हे माहेर आहे. त्यांचे इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण येथील श्री बसवेश्वर विद्यालयात झाले आहे. त्या सध्या भारतीय जीवन विमा ( एल आय सी ) चे काम करतात. सौ आशाताई सादलापुरे आणि सौ पळसकर या वर्गमित्र या नात्याने ,’ वर्गमित्र बँच १९९२ – ९३ ‘ या व्हाट्सएप ग्रुपच्या सक्रीय सदस्या आहेत.गत १० वर्षापासून त्या अध्यात्मिक काम करतात. त्या प्रवचन आणि शिवकिर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा आणि समाजप्रबोधन करतात.
त्यांना गतवर्षी अखिल भारतीय विरशैव युवक संघटना,” शिवा ” तर्फे ‘ शिवा राष्ट्रीय उत्कृष्ट शिवकिर्तनकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तर परवा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे ,” राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२ मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे समाजातील विविध स्थरातून कौतुक होत आहे.