कंधार
महाराष्ट्रासह देशभरावर आलेल्या कोरोना संकटातून सावरण्यासाठी तूच सुखकर्ता तुच दुखहर्ता आहेस त्यामुळे आम्हा सर्वांना कोरोना महामारी संकटातून मुक्त करा श्री गणरायाला मनोभावे प्रार्थना करताना
विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष यांनी कंधार तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी बामणी येथे श्री ची आरती करताना श्री गणरायाला साकडे घातले आहे .
त्यामुळे तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता आहेस त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुख-समृद्धी व निरोगी आयुष्य द्यावे तसेच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना
चांगले व सुगीचे दिवस यावेत कष्टकरी गोरगरिबांना आर्थिक संकटातून बाहेरपडूदे माझ्या सर्व शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभू दे माझा कंधार तालुक्यात सुजलाम-सुफलाम व्हावा मागील अनेक दिवसांपासून पडत
असलेल्या सततधार पावसामुळे माझ्या बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे त्या नुकसानातून सावरण्यासाठी सरकारला नुकसान भरपाई देण्यासाठी
सद्बुद्धी देवो माझ्या शेतकऱ्याच्या शेतातील लक्ष्मी भरभरून त्यांच्या घरामध्ये येऊ दे अशी श्रीगणरायाच्या चरणी मराठा महासंग्राम संघटनेचे
मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी कंधार तालुक्यातील बामणी येथे आपल्या निवासस्थानी श्रीगणरायाची आरती करून गणरायाला शेतकऱ्यांसाठी साकडे घातले आहे .
यावेळी त्यांचे वडील चंपतराव पाटील शिराळे आई सौ. राधाबाई शिराळे त्यांची पत्नी सौ. सविताताई शिराळे भाऊ ज्ञानेश्वर शिराळे परसराम शिराळे मुलगी वैष्णवी विक्रम पाटील शिराळे बामणीकर व परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.