का रे माझ्या पावसा तू
असा का आहेस ?
कुठे दुष्काळ तर कुठे?
मनसोक्त पडतो आहेस !
पेरणी केल्यावर असा का
तू मध्येच दडतो आहेस ?
पेरलेले बी उगवण्या आधीच
आम्हा घोर लावतो आहेस !
कधी रिमझिम, तर कधी
जोरदार पडतो आहेस !
आता पुरे म्हणतानाही तू
हाहाकार माजवतो आहेस !
उगवलेल्या पीकासह घरे
दारे पूरात ओढतो आहेस
एकिकडे तुझा दुष्काळ तर
दुसरीकडे कहरच करतो आहेस !
– राजेश जेटेवाड (बरबडेकर)
मो. ९४२०८१४०९९