माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या घरी विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा सत्कार

कंधार ;

माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येथील निवासस्थानी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे यांनी आज सोमवार दि.११ एप्रिल रोजी भेट दिली .

यावेळी आमदार श्याम सुंदर शिंदे यांचे स्वागत नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केले .

सध्या मतदार संघात सौ वर्षोताई संजय भोसीकर व जिल्हा कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या कामाची अनेक बाजूनी चर्चा होत आहे. या दोन्ही दाम्पत्यानी वाडी तांडे पिंजून काढले आहेत . सौ वर्षाताई भोसीकर यांनी डिजीटल कॉंग्रेस सभासद नोंदणी अभियानात गावोगाव भेटी गाठी वर जोर दिसून येत आहे .

आज आमदार शामसुंदर शिंदे यांनी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येथील निवासस्थानी भेट दिल्याने व झालेल्या चर्चा यातून राजकीय गणित कोणेते तरी बांधले गेले नसतील ? अशी जोरदार चर्चा या दोन माजी आमदार ईश्वरराव भोसीकर व आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीतून होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *